जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्रेग्न्सीचं एकही लक्षण नाही; वजन कमी होऊन पोटात तीव्र वेदना झाल्या आणि महिलेने अचानक दिला बाळाला जन्म

प्रेग्न्सीचं एकही लक्षण नाही; वजन कमी होऊन पोटात तीव्र वेदना झाल्या आणि महिलेने अचानक दिला बाळाला जन्म

प्रेग्नन्सी लक्षणांशिवाय प्रेग्न्सी. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

प्रेग्नन्सी लक्षणांशिवाय प्रेग्न्सी. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

महिलेमध्ये प्रेग्न्सीची कोणतीच लक्षणं नव्हती तिने अचानक बाळाला जन्म दिला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 07 नोव्हेंबर : प्रेग्नन्सी म्हटलं की त्याची बरीच लक्षणं दिसून येतात. काहीच नाही तर बेबी बम्प तर दिसतंच दिसतं. पण प्रेग्न्सीच्या लक्षणांशिवाय, बेबी बम्प न दिसता कुणी बाळाला जन्म दिल्याचं ऐकलं आहे का? पण एका महिलेच्या बाबतीत हे घडलं आङे. तिने पार्टीत मजामस्ती केली. त्यानंतर अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यानंतर तिने चक्क बाळालाच जन्म दिला. आपल्या या प्रेग्न्सीबाबत या महिलेलाही माहिती नव्हती. अमेरिकेतील प्रेग्न्सीचं हे विचित्र प्रकरण आहे. इंडियाना युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी 21 वर्षांची कायला सिम्पसन, एका पार्टीत गेली. तिथं अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. तिला तात्काळ इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. कायलासह डॉक्टरांनाही तिचं अपेंडिक्स फुटलं असं वाटलं. पण काही तपासण्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. हे वाचा -  धक्कादायक! अवघ्या 23 दिवसांची नवजात चिमुकली ‘प्रेग्नंट’; बाळाच्या पोटात तब्बल 8 भ्रूण, डॉक्टरही शॉक खरंतर कायला प्रेग्नंट होती. याची माहिती तिलाही नव्हती.  न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार सिम्पसन म्हणाली, मला वाटलं मला अपेंडिसाइटिस आहे. त्यामुळे जशा वेदना होऊ लागल्या मी रुग्णालयात गेली. वेदनेने मी ओरडत होते. डॉक्टरही माझा ओरडण्याचा आवाज ऐकून माझ्या रूमजवळ आले. सिम्पसनच्या सांगण्यानुसार तिला नियमित मासिक पाळी येत होती. प्रेग्नन्सीच्या कालावधीत मी गर्भनिरोधक गोळ्या घेत नव्हती. तिला बेबी बम्प नव्हतं. बाळाच्या जन्माच्या काही महिन्यांआधी तिचं वजन कमी झालं होतं. डॉक्टर म्हणाले की प्रेग्नन्सीच्या काळात मासिक पाळी येणं शक्य नाही. काही प्रकरणात स्पॉटिंग असामान्य नाही. प्रेग्नन्सीच्या लक्षणांशिवाय बाळ जन्माला येणं शक्य आहे का? प्रेग्नन्सीच्या लक्षणांशिवाय बाळ जन्माला येण्याचं हे पहिलं प्रकरण नाही याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी डिनाइल म्हणतात.  हे वाचा -  गर्भाशय निरोगी राहण्यासाठी हे पदार्थ नियमित आहारात घ्या, प्रसूती होते सुलभ तरुण महिला ज्या कधी प्रेग्नंट झाल्या नाहीत किंवा अशा महिला ज्यांना आपली रजोनिवृत्ती जवळ आली असं वाटतं किंवा ज्या गर्भनिरोधक वापरत नाही अशा महिलांमध्ये अशी प्रेग्नन्सी दिसून येते. पण एखाद दिवशी गोळी घणं राहिलं किंवा डायरिया असेल तर अशी प्रेग्न्सी होऊ शकते. अनियंत्रित मासिक पाळी असलेल्या महिलांनादेखील त्या प्रेग्नंट आहेत, अशी लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि ज्यांच्यामध्ये हार्मोन्स अनियंत्रित आहेत. अशा महिलांमध्येसुद्धा अशी प्रेग्नन्सी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात