लंडन, 13 डिसेंबर : प्रेग्नन्सी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पुरुष आणि महिलांचे शारीरिक संबंध झाले की गर्भधारणा होते. पण काही कारणांमुळे गर्भधारणा होत नसेल, प्रेग्न्सीत समस्या येत असेल तर वैद्यकीय क्षेत्रात त्यावर उपाय आहे. मेडिकल प्रोसेसमार्फत प्रेग्नंट होण्यासाठी तसा खर्चही बराच असतो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरही लागतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका महिलेने पुरुषाशी संबंध न ठेवता, घरच्या घरी एक इंजेक्शन घेतलं आणि ती प्रेग्नंट झाली. इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये राहणारी 23 वर्षांची शॅनन नजरोविक. जिने आपण घरीच इंजेक्शन घेऊन प्रेग्नंट झाल्याचा दावा केला आहे. फक्त प्रेग्नंट झाली नाही तर तिने एका निरोगी बाळाला जन्मही दिल्याचं ती म्हणाली. लाखो रुपयांची प्रोसिजर तिने एका इंजेक्शनमार्फत केली. आता हे कसं शक्य झालं, याच तुम्हालाच काय सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. कुणाचाच यावर विश्वास बसत नाही आहे. हे वाचा - प्रेग्न्सीचं एकही लक्षण नाही; वजन कमी होऊन पोटात तीव्र वेदना झाल्या आणि महिलेने अचानक दिला बाळाला जन्म द सनच्या रिपोर्टनुसार महिलेने आपण कॅलपोल इंजेक्शनच्या सीरिंजचा वापर केल्याचं म्हटलं आहे. शॅननने या प्रोसिजरला तिने होम इन्सेमिनेशन म्हटलं आहे. तिने सांगितलं, तिच्याजवळ एक स्पर्म डोनर होता, ज्याची तिने मदत घेतली. ती कॅलपोल सीरिंजचा वापर स्पर्म इंजेक्ट करण्यासाठी करायची. 3 महिने कॅलपोलच्या सीरिंजमधून स्पर्म इंजेक्शन घेतल्यानंतर ती प्रेग्नंट झाली. तिने टिकटॉकवर आपला हा कारनामा सांगितला. पण अनेकांना यावर विश्वास नाही. वयाच्या 19 व्या वर्षी ती या प्रक्रियेने प्रेग्नंट झाली आता ती एका मुलीची आई आहे. जेव्हा लोकांनी यावर आपला विश्वास बसत नसल्याचं सांगितलं तेव्हा तिने पुरावा म्हणून आपल्या मुलीला दाखवलं. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.