मराठी बातम्या /बातम्या /Viral /महाकाय अजगराने महिलेच्या मानेभोवती घातला विळखा आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

महाकाय अजगराने महिलेच्या मानेभोवती घातला विळखा आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

महिलेने विशाल अजगराला आपल्या मानेवर घेतलं आणि...

महिलेने विशाल अजगराला आपल्या मानेवर घेतलं आणि...

महिलेने विशाल अजगराला आपल्या मानेवर घेतलं आणि...

लंडन, 20 ऑक्टोबर : साप (Snake) म्हटलं की घाम फुटतो. मग तो लहान असो वा मोठा (Snake video). त्याला पाहूनच आपल्या तोंडचं पाणी पळतं. सापासमोर उभं राहणंही आपल्याला शक्य नाही. पण एका महिलेने तर चक्क महाकाय अजगराला (Python video) आपल्या मानेवर घेतलं. चक्क अजगराशीच ही महिला खेळताना दिसली (Woman playing with Python). सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

एका महिलेने अजगराला आपल्या अंगावर घेतलं आहे (Python on neck). अजगराने आपल्या शेपटीने तिच्या पायाला विळखा घातलेला दिसतो आहे. महिलेने मानेवरून या अजगराला सोडलं आहे. त्याचा तोंडाकडील भाग तिच्या हातात आहे. अजगर महिलेभोवती फिरताना दिसतो आहे. व्हिडीओ पाहून आपल्याच धडकी भरते.

अजगराला आपल्या अंगावर घेणाऱ्या या महिलेच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती दिसत नाही आहे. जणू काही एखादं खेळणंच आहे, अशी ती या अजगरासोबत खेळते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अजगरही जणू काही त्या महिलेला आपली मैत्रीणच मानतो. तो बिलकुल तिच्यावर हल्ला करत नाही आहे.

हे वाचा - Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल

royal_pythons_  इन्टाग्राम अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करण्यात आलं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी या महिलेच्या हिमतीला दाद दिली आहे. तर काहींनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे. काही युझर्सचं मात्र या अजगराने लक्ष वेधून घेतलं. त्याचा इंद्रधनुषी रंग बहुतेकांना आवडला आहे.

याआधीसुद्धा एका तरुणाने अशाच अजगराला आपल्या अंगावर घेतलं होतं. त्यावेळी तर या अजगराने त्या तरुणाच्या संपूर्ण शरीराला जखडलं होतं. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील रेप्टाइल झूचे (Reptile Zoo) फाऊंडर जे ब्रेवर (Jay Brewer)  यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर सापाचा खतरनाक व्हिडीओ पोस्ट केला.

व्हिडीओत पाहू शकता ब्रेवर एका बॉक्समधून या भल्यामोठ्या सापाला बाहेर काढतात. हा साप इतका मोठा आणि जड आहे की त्याला उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ब्रेवरला आणखी काही लोकांची मदत लागते. त्या सापाला उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं. इथं पाहू शकता एका तरुणाला जमिनीवर झोपवलेलं आहे. त्याचे डोळे झाकण्यात आले आहेत. या सापला त्या तरुणाच्या अंगावर सोडलं जातं. त्यानंतर हळूहळू करत हा साप त्या तरुणाला वेटोळे घालतो.

हे वाचा - OMG! एक-दोन नाही डझनभर महाकाय अजगरांनी घातला विळखा; हा खतरनाक VIDEO पाहताना जरा जपून

तरुण सापासह बाहेर येतो. सापाने त्याच्या शरीराला विळखा घातलेला आहे. तरुण तसाच उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतं आहे पण भीतीसुद्धा दिसून येते. साहजिकच इतका मोठा साप फक्त पाहून आपल्याला धडकी भरली आहे, या तरुणाच्या अंगावर तर हा साप सोडण्यात आला आहे, त्याचं काय होत असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो.

First published:
top videos

    Tags: Python, Shocking viral video, Snake, Snake video, Viral, Viral videos