नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : एकमेकांपासून दूर राहूनही नातं टिकवणं हे सर्वात अवघड काम असतं. सोप्या भाषेत याला लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप (Long Distance Relationship) म्हणतात. ज्या व्यक्तीला तुम्ही दररोज भेटता, त्याच्यासोबत नातं टिकवून ठेवणं सोपं असतं. मात्र, ज्याची वर्षात ४-५ वेळाच भेट होते, अशा व्यक्तीसोबत रोमॅन्टिक नातं टिकवून ठेवणं थोडं अवघड असतं. अमेरिकेतील एक तरुणीही अशाच रिलेशनमध्ये होती. मात्र तिच्यासोबत जे काही घडलं, ते एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं (Cheating in Relationship). लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या बाजूला बसली होती नववधू,अचानक कोसळली स्टेजवर अन्… आपल्या प्रियकराला सुंदर सरप्राईज देण्यासाठी ही तरुणी दूरच्या देशातून मैलांचा प्रवास करून त्याच्यापर्यंत पोहोचली. दोघेही वेगवेगळ्या देशात शिकत आहेत. मेरी फॅट्ज नावाची ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी अगदी आनंदात इथे आली होती. मात्र इथे येताच तिला भलतंच सत्य समजलं, जे जाणून तिच्या पायाखालची जमिनच हादरली. मेरीने सोशल मीडियावर स्वतः आपल्यासोबत घडलेली ही घटना शेअर केली. तिचं @maryfatz नावाचं TikTok अकाऊंट आहे आणि तिने व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण घटना दाखवली. मेरी आपल्या बॉयफ्रेंडच्या घराचा दरवाजा वाजवते. मात्र आतून काहीच उत्तर येत नाही. मात्र तिला माहिती होतं की तिचा बॉयफ्रेंड आतमध्येच आहे. मात्र तो दरवाजा उघडत नव्हता कारण आतमध्ये त्याच्यासोबत दुसरीच मुलगी होती. ती बराच वेळ त्याच्या बेडरूमच्या बाहेर उभा राहिली. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, जेव्हा तुम्ही तुमच्या लॉन्ग डिस्टन्स बॉयफ्रेंडला भेटायला जाता आणि तो यामुळे दरवाजा उघडत नाही कारण आतमध्ये दुसरी मुलगी असते.
नवऱ्या मुलीचा हट्ट भारी, नवरदेवाची वरात ‘जेसीबी’तून दारी, LIVE VIDEO
हा व्हिडिओ आतापर्यंत 28.4 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे आणि ७ हजारहून अधिकांनी यावर कमेंट करत मुलीला सपोर्ट केला आहे. काही लोकांनी आपले असेच अनुभव शेअर केले आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये अशा गोष्टी अनेकदा समोर येतात. एका यूजरने सांगितलं की त्याच्यासोबतही अशीच घटना घडली होती.