जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : तरुणीने रेल्वे ट्रॅकवरच उभी केली कार; इतक्यात ट्रेन आली अन्..

Viral Video : तरुणीने रेल्वे ट्रॅकवरच उभी केली कार; इतक्यात ट्रेन आली अन्..

तरुणीने रेल्वे ट्रॅकवरच उभी केली कार

तरुणीने रेल्वे ट्रॅकवरच उभी केली कार

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणी रेल्वे रुळाजवळ कार घेऊन येत असल्याचं दिसत आहे. इतक्यात तिकडून ट्रेन येते अन्..

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 जुलै : सोशल मीडियावर अनेकदा विचित्र आणि हैराण करणारे व्हिडिओ व्हायरल होत राहातात. यातील काबी व्हिडिओ असे असतात जे पाहणाऱ्याचा अक्षरशः थरकाप उडवतात. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये मृत्यू व्यक्तीपासून अवघ्या एका सेकंदाच्या अंतरावर असतो, मात्र शेवटच्या क्षणी त्याचा जीव वाचतो. हा व्यक्तीच्या मृत्यूच्या दाढेतून परत येतो. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी गाडी चालवत रेल्वे ट्रॅकवर पोहोचली आणि तिने आपली गाडी ट्रॅकवरच थांबवली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणी रेल्वे रुळाजवळ कार घेऊन येत असल्याचं दिसत आहे. आधी ती ट्रॅकपासून काही अंतरावर कार थांबवते. पण मग तिच्या मनात काहीतरी येतं आणि समोरून येणारी ट्रेन पाहून ती गाडी रेल्वे रुळावर घेऊन येते. मुलीने वेगात जाणारी ट्रेन पाहिली नसावी असंही नाही. तिने काहीही विचार न करता गाडी रुळावर आणली. आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं लक्षात येताच ती गाडीतून उतरते आणि पळू लागते.

जाहिरात

आता पुढे काय झालं असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही गाडी ट्रेनने उडवली असेल असं तुम्हाला वाटेल. मात्र ट्रेनने गाडीला धडक दिली नाही. रेल्वे चालकाने मुलीला गाडी रुळावर आणताना पाहिलं होतं. त्यामुळेच त्यानी योग्य वेळी गाडीपासून काही इंच अंतरावर ट्रेन थांबवली आणि मोठा अपघात टळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Viral Video: रील बनवण्यासाठी धबधब्यातील दगडावर उभा राहिला; पाय घसरताच तरुणासोबत घडलं भयानक व्हिडिओ पाहून युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी योग्य वेळी ट्रेन थांबवणाऱ्या हुशार माणसाचं कौतुक केलं आहे, तर महिलेला फटकारलं आहे. एका युजरने म्हटलं की, “महिलेचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करून तिला शिक्षा झाली पाहिजे.” दुसर्‍या युजरने विचारले की, ‘ती गाडी समोर का नेली, मागे का नाही?’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात