जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Amazon वरून 12 हजारांचा टूथब्रश मागवला, पॅकेट उघडताच महिलेचे दातच आंबले!

Amazon वरून 12 हजारांचा टूथब्रश मागवला, पॅकेट उघडताच महिलेचे दातच आंबले!

ऑनलाईन फ्रॉड

ऑनलाईन फ्रॉड

ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या सोईमुळे आता सर्वजण घरपोच हवं ते मागवू शकतात. घरपोच सुविधेमुळे लोक बराबाहेर पडण्याचा कंटाळा करत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : ऑफळे आणि भाज्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते दागिन्यांपर्यंत लोक ऑनलाइन ऑर्डर करत आहेत. ऑनलाईन ऑर्डरचा जेवढा फायदा आहे तेवढाच तोटाही. अनेकवेळा ऑनलाईन केलेल्या वस्तूव्यतिरीक्त भलतीच वस्तू घरपोच होत असलेली पहायला मिळते. यामुळे ग्राहकांना लाखोंचा गंडाही बसतो. असाच गंडा बसलेला आणखी एक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने Amazon वरुन 12, 000 हजार रुपयांचा टूथब्रश ऑर्डर केला होता. मात्र पॅकेट उघडताच तिला समोर भलतंच काही दिसलं. याविषयी ट्विट करत महिलेने संताप व्यक्त केला आहे. हा कटू अनुभव लोकांसोबत शेअर करताना @badassflowerbby हँडल असलेल्या एका महिला वापरकर्त्याने ट्विटरवर लिहिले, ‘माझ्या आईने महागड्या टूथब्रशसाठी डिलिव्हरीवर रोख पैसे दिले होते. मात्र त्याने पॅकेट उघडले असता आतून एमडीएच चाट मसाल्याचे चार कॅन बाहेर आले. हे बघून महिलेच्या आईला धक्काच बसला.

जाहिरात

महिलेने पुढे लिहिले की, ‘सवलत पाहून लोक वस्तू खरेदी करण्यास उत्सुक असतात. महिलेने विचारले की लोकांनी चेक करुन रिव्ह्यु वाचून घेतलं तरी विक्रेत्याची फसवणूक होणार नाही याची काय हमी आहे. अॅमेझॉनवर प्रश्न उपस्थित करत महिलेने विचारले आहे की, ‘तो आपल्या वेबसाइटवर फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना कसं ठेवत आहे. जे लोकांची वारंवार फसवणूक करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

महिलेने तिच्या ट्विटसोबत युजर रिव्ह्यूचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेकांनी टूथब्रशऐवजी मसाल्यांची पॅकेट मिळाल्याची तक्रार केली आहे. स्क्रीनशॉटनुसार, वापरकर्ते तक्रार करत आहेत तरीही त्यांचे ऐकले गेले नाही. महिलेचे म्हणणे आहे की पैसे देण्यापूर्वी तिच्या आईने डिलिव्हरी एजंटसमोर पॅकेट उघडले होते. महिलेची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रियागी येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात