जगात अनेक जण अनेक प्रकारचं साहस करत असतात. कुणाला उंचावरून उडी मारायला आवडतं, तर कुणाला चक्क उंचावर बेड लावून त्यावर झोपायला आवडतं. या जगात अशी एक जागा आहे, जिथं लोक 300 फूट उंचीवर बेड लावून त्यावर झोपणं पसंत करतात.
आकाश आणि जमीन यांच्या मध्ये लटकणाऱ्या बेडवर पहुडलेल्या दोन तरुणांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. चीनमधील एका थिम पार्कमध्ये हा बेड बांधण्यात आला आहे.
300 फूट उंचीवर जोरदार वारे वाहत असतात. त्यामुळे हा बेड हलतो आणि त्यावर झोपलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.
चीनप्रमाणेच टर्कीमध्येही असा बेड बांधण्यात आला आहे. कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी मोठ्या तारा बांधून त्याला सुरक्षित करण्यात आलं आहे.