अहमदाबाद, 11 जून : क्षमा बिंदू… नाव तर तुमच्या लक्षात नक्कीच असेल. हो… तीच महिला जिने स्वतःशीच लग्न केलं. सोलोगॅमी करणारी भारतातील पहिली महिला. जिच्या लग्नामुळे एकच खळबळ उडाली होती. तिचं लग्न चांगलंच चर्चेत आलं होतं. क्षमाच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. तिने वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे. लग्नाच्या वाढदिवशीच तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. ज्यात ती कसं आयुष्य जगते आहे ते दाखवलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला आपण स्वतःशीच लग्न करणार असल्याची घोषणा करून गुजरातमधील क्षमा बिंदू चर्चेत आली होती. तिने 8 जून रोजी बडोद्यातील तिच्या राहत्या घरी लग्न केलं. या वेळी तिनं मेंदी, हळद समारंभ, संगीत या सर्व कार्यक्रमांचंही आयोजन केलं होतं. लग्नातील सर्व सोहळ्यांचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.
क्षमाच्या या लग्नाची देशभरात जोरदार चर्चा झाली होती. लग्नानंतर ती ऑगस्टमध्ये गोव्याला सोलो हनिमूनलाही गेली होती. तो, ती आणि साप! आयुष्यात कधीच पाहिली नसेल अशी अनोखी LOVE STORY गोत्री इथं राहणाऱ्या क्षमाने एमएस युनिव्हर्सिटीमधून समाजशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. क्षमाला लहानपणापासूनच लग्न करण्याची इच्छा नव्हती. लग्न ही परंपरा तिला कधीच आवडली नसली तरीही नवरी होण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे तिनं स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला लोकं त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. मी स्वतःच्याच प्रेमात आहे आणि म्हणूनच मी अशाप्रकारे लग्न करत असल्याचं ती म्हणाली होती. तिच्या लग्नाला काही लोकांनी समर्थन दिलं होतं, तर अनेकांनी याचा विरोध केला होता. दरम्यान, लग्नानंतर तिला सुभानपुरा भागात तिचा फ्लॅट रिकामा करावा लागला होता. तिच्या घरी पाहुण्यांची ये-जा वाढल्याने नाराज शेजाऱ्यांशी तिचं भांडण झालं होतं. Dowry : पोलीस हवालदाराचा आदर्श; फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला.. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव आता क्षमाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. स्वतःशीच लग्न केल्यानंतर ती काय करते आहे, ती कसं आयुष्य जगते, तिचा संसार कसा सुरू आहे, हे तिने एका व्हिडीओतच दाखवलं आहे. @kshamachy या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हॅप्पी फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे.
यात तिने आपल्या लग्नापासून ते वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे सर्व क्षण दाखवले आहेत. व्हिडीओत ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना, स्वतःचं आयुष्य मनसोक्तपणे जगताना, मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसते आहे.