नवी दिल्ली, 16 एप्रिल : भारतात तुम्हाहा अनेक वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती पहायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी खाण्याची निराळी शैली पहायला मिळेल. एवढंच नाही तर आजकाल तुम्हाला प्रयोग केलेल्या नवनवीन गोष्टींचाही आस्वादही घेता येईल. अनेकांना खायला खूप आवडतं त्यामुळे ते खाण्याच्या नवनवीन गोष्टी ट्राय करताना दिसून येतात. एवढंच नाही तर एखादा नवा पदार्थ बाजारात आला तरी तो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतो.
सध्या एका महिलेचा पराठा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेने बनवलेल्या पराठ्याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तिने चक्क 500 रुपयाच्या नोटेने भरलेला पराठा बनवला आहे. तुम्हाला ऐकून कदाचित विचित्र वाटेल मात्र ही खरी गोष्ट असून याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हेही वाचा - सिंहिणीला घाबरवायला हत्तीने केलं असं काही….जंगलाच्या राणीलाही ठोकावी लागली धूम व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला पराठ्याचे पीठ लाटताना आणि त्यामध्ये 500 रुपये भरताना दिसत आहे. नंतर ती पिठाचा पत्रा दुमडून पातळ पराठ्यात पीठ लाटते. त्यावर तेल लावून गरम तव्यावर ठेवते. पुढे ती नेहमीच्या पराठ्याप्रमाणे शिजवते आणि स्टोव्हवरून उतरवते. त्यानंतर महिलेने पराठा उघडला आणि 500 ऐवजी 2000 रुपयांची नोट काढली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आणि हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला. असा खाण्याच्या प्रकार कोणीही पहिल्यांदाच पाहिला असेल.
janu9793 नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहेत. पराठा बनवण्याची ही असामान्य पद्धत पाहिल्यानंतर वापरकर्त्यांना धक्काच बसला. इतकंच नाही तर व्हिडीओतील महिलेने 500 ते 2000 रुपये बदल्याची कल्पना पाहून अनेकांना हसूही आलं. अनेकांनी तिची मजा घेतली. तर काहींनी महिलेच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त केला.