जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सिंहिणीला घाबरवायला हत्तीने केलं असं काही....जंगलाच्या राणीलाही ठोकावी लागली धूम

सिंहिणीला घाबरवायला हत्तीने केलं असं काही....जंगलाच्या राणीलाही ठोकावी लागली धूम

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

जंगलातील निरनिराळे प्राणी आणि त्यांच्याविषयी काही खास गोष्टी कायमच उत्सुकता वाढवत असतात. जंगलातील अवाढव्य प्राणी आणि जबरदस्त शिकारी यांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 एप्रिल : जंगलातील निरनिराळे प्राणी आणि त्यांच्याविषयी काही खास गोष्टी कायमच उत्सुकता वाढवत असतात. जंगलातील अवाढव्य प्राणी आणि जबरदस्त शिकारी यांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हत्ती आणि सिंहिण यांच्यातील चकमक या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. दोघांच्या या चकमकीच नक्की कोणाचा विजय झाला हे व्हिडीओच्या शेवटी पहायला मिळतं. या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अवाढव्य हत्तीने शिकारीमध्ये निपुण असलेल्या सिंहिची कशी हवा टाईट केली हे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता, एक तलाव आणि छोटी विहिर दिसत आहे. त्याच्या बाजूला सिंहिण आराम करत आहे. तेवढ्यात तिथे हत्ती पळत येतो. त्याला पाहून सिंहिण उठते आणि तो घाबरलेलाही दिसून येतोय. दोघेही एकमेकांना बघत टशन दाखवताना दिसतात. हत्ती शेजारी असलेल्या छोट्या विहिरीतून पाणी प्यायला लागतो. तो दोन तीन वेळेस आपली सोंड फिरवत पाणी पितो. त्याला पाहून सिंहिण दबक्या पावलात निघायची वाट बघतेय. तेवढ्यात हत्ती सोंडेने सिंहिणीच्या अंगावर पाणी फवारतो आणि सिंहिण तेथून धूम ठोकते. हत्ती देखील तिच्यामागे धावतो तोपर्यंत सिंह तेथून सुसाट पळत खूप दूर जातो.

Latest Sightings नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओला 6.5 कोटी व्ह्युज मिळाले असून 21 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. याशिवाय व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंटही पहायला मिळत आहेत. हेही वाचा -  टॉयलेट सीटपेक्षा जास्त घाण मेकअप ब्रशमध्ये, तज्ञांनी काय सांगितलं पाहा दरम्यान, सोशल मीडियावर असे प्राण्यांशी संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांचीही अशा व्हिडीओंना चांगली पसंती असते. वन्य प्राणी आणि त्यांच्याविषयीच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकजण नेहमीच उत्साही असतात. त्यांच्याविषयीचे व्हिडीओ लवकर चर्चेत येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात