12 मुलांचे कुटुंब असलेल्या ब्रिटनी चर्चला केवळ खाण्यापिण्यावर दरमहा हजारो रुपये खर्च करावे लागतात. यानंतर मुलांचे कपडे आणि डायपरचा खर्च वेगळा असतो. अमेरिकन महिला ब्रिटनीला यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही, कारण तिने आता स्वत:चा व्यवसाय सुरू केलेला आहे.
एकेकाळी कारखान्यात काम करणारी ब्रिटनीचं आता सोशल मीडियाच करिअर ठरत आहे. घरी बसून ती तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित व्हिडिओ बनवते आणि टिकटॉकवर अपलोड करते आणि त्यातून खूप पैसे कमावत आहे.
Britney चे Tiktok वर 18 लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि त्यातून ती बक्कळ पैसेही कमावते.
द सनच्या वृत्तानुसार तिच्या एका फॉलोअरने तिला तिच्या पतीच्या नोकरीबद्दल विचारले तेव्हा अर्कान्सासमध्ये राहणाऱ्या ब्रिटनीने तिच्या 29 वर्षांच्या पतीच्या नोकरीबद्दल जास्त काही सांगितलं नाही फक्त त्याची स्वतःची नोकरी असल्याचं सांगितलं.
8 मुलं होईपर्यंत ती नोकरी करत राहिली मात्र तीन मुलांना एकत्र जन्म दिल्यानंतर तिने नोकरी सोडली आणि तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली होती.
टिकटॉक व्यतिरिक्त इन्स्टाग्रामवर ब्रिटनीचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती सांगते की दर आठवड्याला तिला जेवणासाठी 23 हजार रुपये खर्च करावे लागतात. तर दर आठवड्याला 600 डायपर विकत घ्यावे लागतात.