जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी

Shocking! वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी

अशा पद्धतीने वजन घटवणं महिलेला पडलं महागात (प्रतीकात्मक फोटो)

अशा पद्धतीने वजन घटवणं महिलेला पडलं महागात (प्रतीकात्मक फोटो)

वजन घटवण्यासाठी महिला एका सलूनमध्ये गेली आणि तिथे तिने खास उपाय करवून घेतला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बीजिंग, 01 डिसेंबर : आपण स्लीम ट्रिम असावं असं कुणाला वाटत नाही. यासाठी कित्येक लोक काय काय नाही करत. काही लोक खाणं-पिणं सोडतात. काही लोक विशिष्ट डाएट फॉलो करतात, काही एक्सरसाइझ, योगा, जीमची मदत घेतात. पण काही वेळा वजन घटवण्यासाठी केलेले उपाय महागात पडू शकतात. असंच एका महिलेसोबत घडलं. वजन घटवण्यासाठी तिने असा उपाय केला, ज्यामुळे तिची किडनीच फुटली. चीनच्या जेंजियांग प्रांतातील ही धक्कादायक घटना आहे. 41 वर्षांची ही महिला एक्सरसाइझ आणि डायटिंगशिवाय वजन घटवण्यासाठी तिने आणखी एक खास उपाय केला. हांगजाऊतील एका सलूनमध्ये गेली. जिथं वजन घटवण्यासाठी एक खास वेट लॉस मसाज केला जात होता. तिच्या पोटाच्या खालील भागाची मालिश होत होती, तेव्हा तिला तीव्र वेदना झाल्या. तिने मालिश करणाऱ्याला याबाबत सांगितलं. तर त्या व्यक्तीने शरीरातील फॅट सुटत असल्याने असं होत असल्याचं कारण दिला. हे वाचा -  अजब प्रकरण! गुन्ह्यांवर भारी पडलं वजन; लठ्ठ म्हणून आरोपीची सुटका, हायकोर्टाकडून जामीन त्यानंतर मसाज पूर्ण होईपर्यंत संपूर्ण सेशल महिलेने वेदना सहन केल्या शेवटी तिला उठून उभंही राहता येईल. तिला उलटी होऊ लागली. डायरियासारखी लक्षणं दिसू लागली. कुटुंबाने तिला तात्काळ रुग्णालयात नेलं.

News18लोकमत
News18लोकमत

डॉक्टरांनी तिचा सीटी स्कॅन केला तेव्हा तिची एक किडनी फुटल्याचं समजलं. डॉक्टरांनी सांगितलं की, महिलेच्या किडनीत बेनाइन ट्युमर होता. हा खतरनाक ट्युमर नसतो, यामुळे काही धोका नसतो. पण जोरात मालिश केल्याने तो फुटलं आणि त्यात रक्तस्राव सुरू झाला. जर मालिश जोरात नसती तर हा ट्युमर फुटला नसता.  महिलेचं ऑपरेशन करून तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. मसाज करताना काय काळजी घ्यावी? मालिशचा  कोणताच अनुभव नसेल तर मालिश सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल योग्य ती माहिती मिळवा. जर सुरूवातीला तुम्हाला मसाज जमत नसेल तर तज्ञ्ज व्यक्ती अथवा तुमच्या जोडीदाराची मदत घ्या. मालिशसाठी घरात सहज उपलब्ध होणारे तेल वापरा. जसे की नारळाचे तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल. तुमच्या बोटांच्या मदतीने सर्वांगाला तेल लावा आणि हलक्या हाताने वरच्या  दिशेने बोटे फिरवून मालिश करा. कंबरेला मसाज करण्याठी पोटावर झोपा आणि त्यानंतर पाठ आणि कंबरेला मसाज करा. हे वाचा -  Women Health : महिलांना ब्रेस्ट बाबतीत या चुका करणं पडू शकतं महाग; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला कमीत कमी तीस मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर थोडा आराम करून मग कोमट पाण्याने अंघोळ करा. मालिश केल्यावर चालताना विशेष काळजी घ्या लादीवरून पाऊल सरकण्याची शक्यता असते. आठवड्यातून एकदा अथवा दोनदा तुम्ही शरीराला तुम्ही मसाज करू शकता. मालिश करण्यासाठी शक्य असल्यास सुट्टीचा दिवस निवडा. घाई घाईने मालिश उरकू नका कारण त्यानंतर थोडावेळ रिलॅक्स होणं गरजेचं आहे. मालिशचा टॉवेल आणि साहित्य वेगळं ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात