लंडन, 18 जुलै : अनेकदा आपण डोकेदुखी, पोटदुखी अशा काही समस्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करतो. हा त्रास नेहमी होतो, बरं वाटेल, असं समजून आपण सोडून देतो. असंच करणं एका महिलेला महागात पडलं आहे. या महिलेच्या पोटात सतत वेदना होत होत्या. पण तिने याला सामान्य पोटदुखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी तिच्याकडे आयुष्याचे फक्त 24 तास उरल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. यूकेतील हे प्रकरण आहे. व्हिक्टोरिया डॅन्सन असं या महिलेचं नाव. 33 वर्षीय व्हिक्टोरियाला पोटदुखीचा त्रास होत होता. अनेकदा ती थकलेली दिसत होती. तणावामुळे असं होत असेल, टेन्शन संपलं की बरं होईल, असं तिला वाटलं. पण तसं झालं नाही. उलट तिचा त्रास अधिकच वाढला. अखेर तिने डॉक्टरांकडे धाव घेतली.
व्हिक्टोरिया म्हणाली, मला खरोखर काय घडत आहे हे समजून घेण्यास वेळ मिळाला नाही. मला एवढंच माहीत होतं की मला वेदना होत आहेत आणि त्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी मी काहीही करेन. म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. हिरवी झाली जीभ आणि त्यावर आले काळे केस; एका चुकीचा भयानक परिणाम, तुम्हीही तेच करताय डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तिच्याकडे जगण्यासाठी फक्त 24 तास उरल्याचं त्यांनी तिला सांगितलं. तिच्या पोटात गंभीर संसर्ग झाला होता. त्यामुळे जखम झाली होती. जर ते बरं झालं नाही तर संपूर्ण शरीरात विष पसरेल असं डॉक्टरांनी तिला सांगितलं. हे ऐकून व्हिक्टोरिया घाबरली. यानंतर डॉक्टरांनी तातडीने तिच्यावर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी व्हिक्टोरियाच्या आतड्याचा 18 इंच भाग कापून काढला. तिला आयलोस्टोमी बॅग देण्यात आली असून तिच्या मदतीने ती जिवंत आहे. तिने डॉक्टरांना बॅगशिवाय राहता येईल का विचारलं पण डॉक्टरांनी ती त्याशिवाय जगू शकत नाही, असं सांगितलं. पायावर अचानक आली एक खूण, 9 दिवसांतच तरुणीचा मृत्यू; तुमच्या पायावर तर नाही ना? न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, तिला झालेला आजार इतका गंभीर होता की, तिची जीवनशैली बदलण्यास भाग पाडलं गेलं. आता ती अशा समस्यांवर मात करण्यासाठी इतर लोकांना मदत करत आहे. तिने एक ग्रुपही बनवला आहे, ज्याच्या मदतीने ती लोकांना सपोर्ट करत आहे. व्हिक्टोरिया म्हणाली, यावेळी भावनिक आधाराची सर्वाधिक गरज असते. त्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी मी विद्यापीठात कार्यशाळा घेतो. जर तुमच्यासोबतही असं काही घडत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.