नवी दिल्ली 20 मार्च : बर्याचदा दारूच्या नशेत असलेले लोक अशा गोष्टी करतात ज्या अतिशय हैराण करणाऱ्या असतात (Weird Act of Drunk People). नशेत काही लोक इतरांना मारायला लागतात, काही नाचायला, काही गायला आणि काही जास्त हसायला किंवा रडायला लागतात. पण इंग्लंडमधील एका महिलेने नशेत असं काही केलं की शुद्धीवर आल्यानंतर तिला स्वतःलाच धक्का बसला. महिलेनं मद्यधुंद अवस्थेत तिच्या शरीरावर अज्ञात पुरुषाचं नाव गोंदवलं (Woman Tattooed Strangers Name on Hip). ‘हा तर भारतीय Iron Man’; हाताने केले दगडाचे 2 तुकडे, VIDEO पाहून नेटकरी अवाक इंग्लंडमधील हेरफोर्ड येथे राहणारी 32 वर्षीय कायली विल्यम्स आता 2 मुलांची आई आहे, परंतु जेव्हा ती अविवाहित होती तेव्हा ती तिच्या मित्रांसोबत खूप मजा करायची आणि फिरायला जायची. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 2012 मध्ये कायली तिच्या गर्ल गँगसोबत स्पेनमधील मगलुफ शहरात गेली होती, जिथे त्यांनी मजेत पार्टी केली. पण एक दिवशी त्यांची मजा शिक्षेत बदलली. कायली आणि तिची मैत्रीण पार्टी करून पबमधून बाहेर आल्या, तेव्हा त्या एका टॅटू शॉपच्या बाहेर पोहोचल्या. जिथे काही स्पॅनिश पुरुष उभे होते. ते पुरुष या दोघींसोबत बोलू लागले आणि मग एका व्यक्तीने त्यांना एक विचित्र चॅलेंज दिलं. त्याने कायलीला तिच्या हिपवर आपल्या नावाचा टॅटू काढण्याचं चॅलेंज दिलं. कायली शुद्धीवर नव्हती, म्हणून लगेचच तिने या व्यक्तीला होकार दिला. पण तिने अट ठेवली की टॅटू काढण्याचे पैसे या व्यक्तीलाच द्यावे लागतील. 5 लाखात खरेदी केला पुतळा;20 वर्षानी समोर आलं 200 वर्षापूर्वीचं थक्क करणारं रहस्य हे ऐकून त्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटलं, पण तोही मस्ती करण्याच्या मूडमध्ये होता, म्हणून त्याने होकार दिला. कायलीने तिच्या हिपवर ‘डॅनियल फोर्ड’ नावाचा टॅटू काढला आहे. या गोष्टीला 10 वर्ष झाले आहेत, तिला डॅनियलचा चेहराही आठवत नाही किंवा त्याच्याबद्दल काहीच माहिती तिला नाही. तो तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. अशा स्थितीत आपल्या अंगावर एखाद्या अनोळखी व्यक्तीचा टॅटू गोंदवून घेतल्यानं तिला आजही हसूही येतं आणि पश्चातापही होतो. तो प्रसंग आठवून तिचे मित्र-मैत्रिणी आजही तिच्यावर हसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.