Home /News /viral /

Shocking! रेस्टॉरंटमधून मागवलं खाणं; डब्यात महिलेला मिळालं कापलेलं डोकं

Shocking! रेस्टॉरंटमधून मागवलं खाणं; डब्यात महिलेला मिळालं कापलेलं डोकं

ज्या रेस्टॉरंटमधील फूड ही महिला नेहमी आवडीने खात होती त्याच फूडमध्ये तिला जे सापडलं ते पाहून धक्काच बसला.

    वॉशिंग्टन, 30 ऑक्टोबर : सध्या कोरोना काळात बऱ्याच लोकांनी घरीच फूड ऑर्डर (Online food order) केलं. ऑनलाइन फूड डिलीव्हरी मिळाल्यानंतर त्यात काही ना काही विचित्र सापडल्याची काही प्रकरणंही समोर आली. आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं एका महिलेने रेस्टॉरंटमधून चिकन ऑर्डर केलं (Woman Ordered Chicken from Restaurant) आणि तिला चिकनच्या डब्यात चक्क कापलेलं डोकं सापडलं (Chicken Head in Order of Wings). अमेरिकेच्या (USA) पेन्सिलव्हेनियामध्ये (Pennsylvania) राहणारी ब्रिटनी पॉलहॅमसने (Brittani Paulhamus) ओल्ड स्कूल पिझ्झा (Old School Pizza) रेस्टोरंटमधन चिकन मागवलं. तिनं याआधीसुद्धा या रेस्टॉरंटमधील चिंकन विंग्स खाल्ले होते, जे तिला खूप आवडले होते. म्हणून तिने पुन्हा ऑर्डर दिली. ऑर्डर पोहोचताच तिने उत्साहात खाण्यासाठी डबा उघडला आणि तिला जबर धक्का बसला. टुडे फूड वेबसाईटशी बोलताना ब्रिटनीने सांगितलं, जेव्हा तिने डब्बा उघडला तेव्हा खूप सुंदर वास आला. तिने चिकनचा एक तुकडा खातात घेतला आणि एकाच वेळी फस्त केला. त्यानंतर तिने जसा दुसरा तुकडा उचलला तसं त्याच्याखाली तिला एक विचित्र तुकडा दिसला. विंग्सच्या तुकड्यापेक्षा तो वेगळा होता. हे वाचा - Yuck! कांदा, बटाटा, मिरची नव्हे तर पालीची भजी; Pakora packet मध्ये Fried Lizard तिने तो तुकडा हातात घेऊन त्याच्याकडे नीट पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तो तुकडा विंग्सचा नाही तर चक्क डोक्याचा तुकडा होता. ब्रिटनीलाल चिकन विंग्सच्या डब्यात चिकन हेड सापडलं. कोंबड्याचं कापलेलं डोकं त्यात होतं. ब्रिटनीने त्याचे फोटो काढले आणि फेसबुकवर शेअर केले. ब्रिटनी म्हणाली, "मला हा फोटो फेसबुकवर पोस्ट करावा लागला कारण मला जसं डबा उघडताच चिकनचं डोकं दिसलं तसं तुम्हाला दिसू नये. मी आधीसुद्धा या रेस्टॉरंटमधून चिकन विंग्स ऑर्डर केले आहेत. मला माहिती आहे, तिथले चिकन विंग्ज खूप चविष्ट असतात. पण मला विंग्ससह कोंबडीचं डोकंही मिळेल याचा विचारही केला नव्हता" हे वाचा - Shocking! McDonald's Roll मध्ये दिसलं Nipple; पाहताच हादरलेल्या तरुणाने मग... तिने याबाबत रेस्टॉरंटकडेही तक्रार केली. रेस्टॉरंटने महिलेची माफी मागितली आणि तिला तिचे पैसे परत देण्याची तयारी दर्शवली. तसंच तिला दिलेलं पार्सलही तिला रेस्टॉरंटकडे परत करण्यास सांगितलं जेणेकरून ते आपल्या वितरकांशी याबाबत संपर्क करतील.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, Chicken, Food, Lifestyle, USA

    पुढील बातम्या