नवी दिल्ली, 3 मार्च : ट्रेनने होणाऱ्या घटनांचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावरुन (Social Media) समोर येतात. प्लॅटफॉर्म चढताना लक्ष दिलं नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. अनेकदा ट्रेनचा मोठा अपघात (Train Accident Viral Video) होतो, यात जीवदेखील जाऊ शकतो. पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्टेशनचा एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक महिला प्लॅटफॉर्मवर पडताना दिसत आहे. मात्र तेथे उभ्या असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सावधानतेमुळे महिलेचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओ कर्नाटकच्या बेल्लारी स्टेशनचा आहे. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, निष्काळजीपणा किती धोकादायक ठरू शकतो. हा व्हिडीओ 1 मार्चचा सकाळी 4.30 मिनिटांचा आहे. एक महिला गडग जाण्यासाठी हरिप्रिया एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. महिले जेव्हा ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते, तोपर्यंत ट्रेन स्टेशनवरून निघाली होती. हे ही वाचा- लेकाला वाचवण्यासाठी चवताळलेल्या बैलासमोर आला बाबा आणि…; धडकी भरवणारा VIDEO
Another psgr in a hurry saved by Govt Rly Police. Lady rescued @ Bellary stn @ 4.30am 2day by cop Maruti when she slipped when brd Haripriya Exp 2 her hometown Gadag @XpressBengaluru @NewIndianXpress @KARailway @KannadaPrabha @AshwiniVaishnaw @deepolice12 @DgpKarnataka @GowriIps pic.twitter.com/skvWBDqdAE
— S. Lalitha (@Lolita_TNIE) March 1, 2022
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ट्रेनची गती हळूहळू वाढते. महिला ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतेस मात्र तिला चढता येत नाही आणि खाली पडते. महिलेला चालत्या ट्रेनमध्ये चढताना एक पोलीस कर्मचारी लांबून पाहतो आणि तिला वाचवण्यासाठी धावत सुटतो. स्टेशनवर पोलिसांनी सावधानता बाळगल्याने मोठा अपघात टळला आहे.