पाटणा 24 एप्रिल : बिहारची राजधानी पाटण्यात एक महिला रस्त्यावरील मॅनहोलमध्ये पडली. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. ही महिला फोनवर बोलत रस्त्यावर चालत असते. तिच्या समोरच असलेली ऑटो या मॅनहोलच्या वरुन जाते, त्यामुळे महिलेचं या होलकडे लक्षच जात नाही. रस्त्याच्या मधोमध असलेल्या या मॅनहोलचं झाकण उघडंच होतं. यावर उभा असलेली ऑटो पुढे जाताच महिला थेट या मॅनहोलमध्ये कोसळते (Woman fell in open Manhole Video). महिला यात पडताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. काही सेकंदातच महिलेला बाहेर काढण्यात आलं.
या अपघातात महिलेचा जीव वाचला, मात्र या घटनेच्या व्हिडिओने शहरातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. आता या प्रकरणाबाबत बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष आरजेडीने शहरातील उघडे पडलेले मॅनहोल आणि स्थानिक प्रशासनाच्या कामावरून सरकारवर निशाणा साधला आहे. घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
पूरे पटना शहर में हज़ारों ऐसे मैनहोल हैं जिनमें ढक्कन नहीं है! सरकार को रत्तीभर फ़िक्र नहीं है नागरिकों की! pic.twitter.com/WWiN5An7Qi
— RJD Patna (@patna_RJD) April 22, 2022
ही घटना पाटणा शहरातील वॉर्ड क्रमांक 56 ची आहे. ही महिला बाजारातून परतत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडली. महिलेच्या एका हातात सामान होतं तर एका हाताने ती फोन कानाला लावून फोनवर बोलत होती. यादरम्यान ओव्हरब्रिजजवळ असलेल्या रस्त्यावर एक मॅनहोल उघडं होतं. महिला मॅनहोलच्या जवळून जाताना इकडे तिकडे पाहू लागली आणि अचानक चेंबरमध्ये पडली. मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित लोकांनी धाव घेतली. मात्र यातून सुखरूप बाहेर काढल्यानंतर बराच वेळ महिला सदम्यात होती.
'अग्नी खेळी'दरम्यान एकमेकांवर जळत्या मशाली फेकताना दिसले लोक; भयानक VIDEO, नेमका काय आहे प्रकार?
या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी आहे. प्रत्यक्षात पाटण्यात अनेक ठिकाणी मॅनहोल उघडे आहेत तर अनेक ठिकाणी रस्ते तुटलेले आहेत. एनएमसीएच ते मालिया महादेव जल्ला रोडपर्यंत नमामि गंगे प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं लोकांचं म्हणणे आहे. याशिवाय इतर कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. शहरातील केसरीनगर, नाला रोड, राजीवनगर, आशियाना, राजा बाजार यासह अनेक भागात उघड्या मॅनहोल्समुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Shocking video viral