जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Bikini Farmer: महिला बिकिनी घालून करते शेती, सोशल मीडियावर ट्रोल होताच म्हणाली...

Bikini Farmer: महिला बिकिनी घालून करते शेती, सोशल मीडियावर ट्रोल होताच म्हणाली...

व्हायरल

व्हायरल

शेतकरी शेतात खूप राबतात. चांगलं पीक यावं म्हणून ते रात्रंदिवस मेहनत घेतात. शेतातील उत्पन्नातून ते आपलं घर चालवत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : शेतकरी शेतात खूप राबतात. चांगलं पीक यावं म्हणून ते रात्रंदिवस मेहनत घेतात. शेतातील उत्पन्नातून ते आपलं घर चालवत असतात. नुकतंच सोशल मीडियावर एका महिला शेतकऱ्याची चर्चा रंगली आहे. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायेत. ज्यामुळे महिला शेतकऱ्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. सध्या चर्चेत आलेली महिला शेतकरी स्वःताला ‘बिकीनी फार्मर’ म्हणवते. खरं तर ही महिला शेतकरी युरोप मधील आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, अलीकडेच जेव्हा तिचे फोटो व्हायरल झाले तेव्हा लोकांना तिची संपूर्ण कहाणी कळली. ही महिला शेती करते आणि तिलाही शेतीची आवड आहे. महिलेकडेही अनेक घोडे आहेत, ती घोडेस्वारीचीही शौकीन आहे. विशेष म्हणजे ही महिला फक्त बिकिनी परिधान करून शेती करते. हेही वाचा -  जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा: 655 कोटींचा मालक, लाइफस्टाइल सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही या महिलेचे @the_fancy_farmer नावाचं अकाऊंट आहे. यावर ती फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते. या महिलेचे म्हणणे आहे की तिला शेतीचे काम खूप आवडते. नुकतेच सोशल मीडियावर महिलेला बिकिनीमुळे ट्रोल करण्यात आलं तेव्हा महिलेनंही सडेतोड उत्तर दिलं. महिला बिकिनी घालून शेती करू शकत नाही का, असा सवाल महिलेने ट्रोल करणाऱ्यांना केला. महिला सांगितले की, कोणी काहीही बोलले तरी ती हवे ते कपडे परिधान करणार. ही महिला शेतकरी तिच्या शेतातील फोटो पोस्ट करत असते आणि या फोटोंमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, या शेतकरी महिलेचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. मात्र ती ट्रोलर्सला न जुमानता तीचं काम करत असते. याविषयी फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात