नवी दिल्ली, 28 जानेवारी : प्रेम आणि प्रेमाच्या निरनिराळ्या घटना आपण कायमच ऐकत, पाहत असतो. कोण कधी कशाच्या आणि कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. अनेक लव्ह स्टोरी ऐकून तर थक्का बसल्याशिवाय राहत नाही. अशातच यामध्ये आणखी एक भर पडली असून आणखी लव्ह स्टोरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एका महिला टेडी बेअरच्या प्रेमात पडल्याचं समोर आलं आहे. एका पाकिस्तानी महिलेने दावा केला आहे की, ती तिच्या पतीच्या मृत्यूनंतर गेल्या 10 वर्षापासून डेडी बेअरसोबत राहत आहे. याविषयी महिलेने युट्यूब चॅनेलद्वारे तिच्या लव्ह स्टोरी विषयी सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये महिलेने दावा केला आहे टेडी बेअर तिचा साथीदार आहे. टेडी तिला खूप आवडते आणि ती त्याच्यासोबत राहते.
महिला म्हणाली, ती तिच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाचे क्षण फक्त टेडी बियरसोबत शेअर करते. तिच्या यशामागे टेडी बेअरचा हात आहे. तो मी जे काही बोलतो ते ऐकतो. प्रत्येक सुख-दुःखात तो तिचा साथीदार आहे. या महिलेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Social Click या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंटही येत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर असे हटके व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. असे व्हिडीओ लवकर इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. सोशल मीडियावर मजेशीर, विचित्र, हटके, धक्कादायक, अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. काहीजण प्रसिद्धी झोतात येण्यासाठी असे काही व्हिडीओ बनवत असतात. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी असे व्हिडीओ शेअर केले जातात.