पाटणा, 29 एप्रिल : काही गोड बनवायचं असेल तर गूळ हवंच. बरेच लोक टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी जेवणातही गूळ वापरतात. तसं गूळ खरेदी करायला गेलात तर गुळाची पावडर आणि गुळाची ढेप मिळते. गुळाची ढेप किसली किंवा फोडली जाते. एका महिलेने अशीच गुळाची ढेप फोडली. पण त्यानंतर मोठा ब्लास्ट झाला. गुळाचा ब्लास्ट होण्यामागील कारण समजलं तेव्हा सर्व जण हादरले. बिहारमधील ही धक्कादायक घटना आहे. बक्सरच्या बाला देवा गावात राहणारी ही महिला. जिने गुळाची ढेप जोरात जमिनीवर आपटली आणि स्फोट झाला. आवाज इतका मोठा होता की कुटुंबातील सदस्यांसह आजूबाजूचे लोकही धावत आले. त्यांनी जे पाहिलं ते पाहून सर्वांनाच जबर धक्का बसला.
गुळाची ढेप फोडणारी महिला गंभीररित्या जखमी झाली होती. तिची अवस्था भयंकर झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची गंभीर अवस्था पाहता तिला वाराणसीतील रुग्णालयात पाठवण्यात आलं. Alert! मे महिन्यात सर्वात मोठं संकट, हजारो लोकांचा बळी जाणार; खळबळजनक दावा शांती असं या महिलेचं नाव आहे. गुळाची ढेप फोडण्यासाठी ती छतावर गेली होती. पण खरंतर तिने ज्याला गूळ समजलं तो गूळ नव्हता तर बॉम्ब होता. गूळ समजून तिने बॉम्ब जमिनीवर आपटला आणि बॉम्बचा ब्लास्ट झाला. ज्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज तकच्या वृत्ता नुसार बक्सरचे एसपी मनीष कुमार म्हणाले, हा बॉम्ब कुठून आला याबाबत महिलेच्या पतीकडून माहिती घेतली जात आहे. घराच्या आसपासच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.