भविष्याबाबत अंदाज वर्तवणारे अनेक लोक आहेत. अशाच एका व्यक्तीने आता खळबळजनक दावा केला आहे. मे महिन्यातील संकटाबाबत या व्यक्तीने जगाला सावध केलं आहे.
ईनो एलॅरिक असं या व्यक्तीचं नाव आहे. सोशल मीडियावर ती @theradianttimetraveller नावाने ही व्यक्ती प्रसिद्ध आहे. या व्यक्तीने टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ही व्यक्ती आपण टाइम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करते. आपण 2671 सालातून परत आल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्याने मे महिन्यातील संकटाबाबत सांगितलं आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार या व्यक्तीने मे 2023 मध्ये प्रलय येणार आहे, ज्यात हजारो लोकांचा जीव जाईल असं म्हटलं आहे. 15 मे रोजी 750 फूट उंच त्सुनामीच्या लाटा अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणार. ज्यात सॅन फ्रान्सिस्को उद्ध्वस्त होईल.
याशिवाय 30 मे रोजी 150 यूएफओ लोकांना दिसतील, जे धरतीवर कब्जा करण्याच्या तयारीत असतील. (सर्व फोटो-प्रतीकात्मक/सौजन्य - Canva)