मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! 'या तरुणीच्या सुंदर ओठांमुळे देश धोक्यात', PHOTO पाहताच लोक दहशतीत

बापरे! 'या तरुणीच्या सुंदर ओठांमुळे देश धोक्यात', PHOTO पाहताच लोक दहशतीत

 सुंदर ओठांमुळे कौतुकाऐवजी महिलेला करावा लागतोय ट्रोलचा सामना.

सुंदर ओठांमुळे कौतुकाऐवजी महिलेला करावा लागतोय ट्रोलचा सामना.

सुंदर ओठांमुळे कौतुकाऐवजी महिलेला करावा लागतोय ट्रोलचा सामना.

  लंडन, 08 मार्च : आपण सुंदर दिसावं असं बहुतेक महिलांना वाटतं. त्यामुळे पार्लरपासून ते कॉस्मेटिक सर्जरीपर्यंत  (Cosmetic Surgery) शक्य ते सर्व उपाय केले जातात. असाच सुंदर दिसण्याचा मोह असलेली एक महिला सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिचे सुंदर ओठ. तिच्या ब्युटीफूल लिप्समुळे तिचं कौतुक केलं जात नाही तर उलट तिला ट्रोल केलं जातं आहे. तिच्या सुंदर ओठांमुळे देशाला धोका असल्याचं लोक म्हणत आहेत. जॉर्जी गुडे (Georgie Goodey) असं या महिलेचं नाव आहे. 27 वर्षांच्या जॉर्जीने 2019 साली मिस एसेक्स (Miss Essex)   किताब जिंकला होता. गेल्या तीन वर्षांपासून तिने हे नाव राखलं पण आता तिला ऑनलाइन ट्रोल केलं जातं आहे. याला कारण आहे ते म्हणजे तिने केलेली कॉस्मेटिक सर्जरी. स्वतःचं सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी तिने नुकतीने तिने लिप फिलर्स करून घेतले. यानंतरचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आणि आता तिला लोक ऑनलाईन ट्रोल करू लागले आहेत. जॉर्जीने आपल्या चांगल्या चेहऱ्याची वाट लावली, असं लोकांचं म्हणणं आहे. लोक तिच्या फोटोंवर नेगिटिव्ह कमेंट्स देत आहेत. जॉर्जीने सांगितलं की 10 पैकी 9 कमेंट्स नेगिटिव्ह येत आहेत. हे वाचा - OMG! ब्युटी ट्रिटमेंटचा भयावह परिणाम; सुंदर दिसण्याऐवजी तरुणी बनली 'माकड' आपल्या ब्युटी ट्रिटमेंट आणि ओठांमुळे ते देशासाठी धोका बनली आहे, असं लोकांनी म्हटलं आहे. आता जॉर्जीच्या ओठांमुळे देशाला धोका कसा काय असू शकेल असा प्रस्न तुम्हाला पडला असेल तर जॉर्जी ही ब्रिटिश आर्मीत सैनिक आहे.  तिचे ओठ खूप मोठे झाले आहेत त्यामुळे शत्रू आता ते दुरूनच पाहू शकतील, असं नेटिझन्स म्हणाले. या एका कमेंटमुळे तिला सर्वात जास्त दुःख झालं आहे.
  जॉर्जीने सांगितलं की आर्मीतील कडक शिस्तीच्या आयुष्यातून ती या सर्जरीमार्फत स्वतःला थोडा वेळ देऊन स्वतःला सुंदर बनवते, यात चुकीच काय आहे. हे वाचा - ...अन् Energy drink ठरलं विष; पिताच 25 वर्षांच्या तरुणाचा झाला मृत्यू जॉर्जीने अशा बऱ्याच कॉस्मेटिक प्रोसिजर करून घेतल्या आहेत. यामध्ये सेमी टॅटू आयब्रोचाही समावेश आहे. याशिवाय ती काही कालावधीने बोटॉक्स ट्रिटमेंटही घेते. सध्या तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील बऱ्याच फोटोंवरील कमेंट सेक्शन बंद केलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Lifestyle, Viral

  पुढील बातम्या