मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दरवाज्याच्या हँडलमध्ये टॉप-पायजमा अडकून महिलेचा मृत्यू; तपास अधिकारीही हैराण

दरवाज्याच्या हँडलमध्ये टॉप-पायजमा अडकून महिलेचा मृत्यू; तपास अधिकारीही हैराण

या महिलेचा मृत अशा परिस्थितीत झाला की, तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्य व्यक्त केलं. यापैकी एक तर म्हणाला की, 20 वर्षांच्या करिअरमध्ये अशी केस पहिल्यांदा पाहिली आहे.

    लंडन, 21 ऑगस्ट : ब्रिटेनमध्ये (UK) एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूमुळे (Woman Death) सर्वजण हैराण झाले आहेत. या महिलेचा मृत अशा परिस्थितीत झाला की, तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्य व्यक्त केलं. यापैकी एक तर म्हणाला की, 20 वर्षांच्या करिअरमध्ये अशी केस पहिल्यांदा पाहिली आहे. (Woman dies after top pajamas get stuck in door handle Investigating officer also shocked) मिळालेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय महिला बारमेड जॅकी कॉट्रिल आपल्या घराबाहेर मृत अवस्थेत सापडली. यावर गेल्या अनेक महिन्यांपासून तपास सुरू होता. बऱ्याच चौकशीनंतर या केसचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने जो पायजमा आणि टॉप घातला होता, तो दरवाज्याच्या हँडलमध्ये अडकला आणि त्यात गळा दबल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, बारमेड जॅकी हँडलमध्ये कपडे अडकल्यामुळे दरवाज्यासमोर पडली. आणि टॉपचा तिच्या गळ्याभोवती फ फास बसला. तपास अधिकारी डॉ. जेम्स एडले यांनी सांगितलं की, 20 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अशा असामान्य घटना कधीच पाहिली नाही. हेही वाचा-कोरोनानंतर जगातील दुर्मिळ आजाराची लागण; सोलापूरातील डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया डेली मेलच्या बातमीनुसार, मिस कॉट्रिल 24 जानेवारी रोजी ब्लॅकबर्नमध्ये आपल्या घराबाहेर मृत अवस्थेत आढळल्या. त्यांच्यासोबत त्यांचा भाचाही सोबत राहत होता. जेव्हा दुपारी जेवणासाठी तो खाली आला तेव्हा वृद्द महिला दरवाज्याजवळ मृत अवस्थेत आढळली. जेव्हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला तेव्हा आजाराची कोणतीही लक्षणं दिसली नाही. मृत्यूचं कारण संशयास्पद नसल्याचं पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: London, Viral news

    पुढील बातम्या