नवी दिल्ला, 29 एप्रिल : वन्य जीवन, वन्य प्राणी यांच्याविषयी लोकांना नेहमीच उत्सुकता आणि कुतुहल वाटत आलं आहे. जंगलातील प्राणी आपली भूक भागवण्यासाठी आपल्यापेक्षा कमकुवत प्राण्यांची शिकार करतात. त्यांच्या हल्ल्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जंगलातील अनेक भयावह व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत. अशातच सध्या समोर आलेला व्हिडीओ एका अस्वलाचा असून तो माशांची शिकार कशी करतोय ते या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता, अस्वल नदीच्या काठावर शांतपणे वाहणाऱ्या नदीकडे बघत बसले आहे. खरं तर त्याने आपले लक्ष नदीवर केंद्रित केले आहे कारण या नदीतूनच त्याला त्याचा निवाळा मिळणार आहे. म्हणजेच नदीच्या काठावर जाणाऱ्या माशांना पकडण्यासाठी अस्वल शांतपणे बसले आहे. जेणेकरून त्याला पाहताच तो त्याला पकडेल आणि कोणतीही चूक करू नये. ध्यान आणि एकाग्रतेमुळे मासे दिसताच अस्वलाने अशा प्रकारे झपाटले की नदीच्या आतून मासे पकडल्यानंतरच ते बाहेर आले. म्हणजेच पहिल्या हल्ल्यातच त्याला यश मिळाले.
Meditation. Concentration. Leads to successful action. 😊pic.twitter.com/H9cSsBAxhX
— anand mahindra (@anandmahindra) April 25, 2023
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट @anandmahindra वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नदीच्या काठावर बसलेले एक तपकिरी अस्वल एकाग्रतेने आणि संयमाने माशाची वाट पाहत असते आणि संधी मिळताच त्याच्यावर झडप घेते. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओद्वारे एकाग्रतेचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याला 28 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान, जंगलातील प्राण्यांचे असे निरनिराळे व्हिडीओ समोर येतच असतात. सिंह, चित्ता आणि वाघ यांसारखे प्राणी, स्वतःहून कमकुवत पण आकाराने मोठ्या प्राण्यांना शिकार बनवतात.