मराठी बातम्या /बातम्या /Viral /

या मांजरीला मिळालं साडेचार लाखांचं गिफ्ट, पार्लरमध्ये जाऊन करते ऐश

या मांजरीला मिळालं साडेचार लाखांचं गिफ्ट, पार्लरमध्ये जाऊन करते ऐश

एका श्रीमंत मालकिणीनं तिच्या मांजराला एक बर्थडे गिफ्ट दिलं आहे. त्याची किंमत आहे साडेचार लाख रुपये.

एका श्रीमंत मालकिणीनं तिच्या मांजराला एक बर्थडे गिफ्ट दिलं आहे. त्याची किंमत आहे साडेचार लाख रुपये.

एका श्रीमंत मालकिणीनं तिच्या मांजराला एक बर्थडे गिफ्ट दिलं आहे. त्याची किंमत आहे साडेचार लाख रुपये.

    मलेशिया, 6 डिसेंबर: एका मांजरप्रेमी मालकिणीनं (Cat Lover) तिच्या मांजरीला वाढदिवसानिमित्त लाखो रुपये किंमतीचं (Gift worth Lakhs of rupees) गिफ्ट दिलं आहे. अनेकजण आपल्या पाळीव प्राण्यांवर (Love on animals) जीवापाड प्रेम करत असतात. त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींची (Care and compassion) काळजी घेत असतात. आपल्या कुटुंबाचा सदस्य असल्याप्रमाणे त्यांना वागणूक देत असतात आणि त्यांचे वाढदिवसही सेलिब्रेट करत असतात. मात्र मलेशियातील एका बिझनेसमन फॅमिलीनं आपल्या मांजरीचा वाढदिवस असा काही थाटात साजरा केला की सर्वांनाच त्याचा हेवा वाटला. मांजरीला साडेचार लाखांचं लॉकेट मलेशियातील बिझनेस वुमन हलिजा मयसूरी या एक मांजरप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. यंदा त्यांच्या मनी नावाच्या मांजरीचा चौथा वाढदिवस होता. वाढदिवसाचं गिफ्ट खरेदी करण्यासाठी त्या बाजारात गेल्या तेव्हा त्यांनी अनेक वस्तू पाहिल्या आणि एक वस्तू निश्चित केली. ही वस्तू होती साडेचार लाखांचं लॉकेट. शुद्ध सोन्यापासून तयार झालेलं हे लॉकेट त्यांनी आपल्या मांजरीसाठी विकत घेतलं आणि तिच्या गळ्यात बांधलं. लॉकेटची जोरदार चर्चा हलिजा यांच्याकडे एकूण दोन मांजरी आहेत. दोन्हीवर त्यांचं प्रेम आहे, मात्र त्यापैकी मनीवर त्यांचा विशेष जीव आहे. मनीच्या गळ्यात साडेचार लाख रुपयांचं लॉकेट घातल्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला असून अनेकांनी मांजरींचा हेवा वाटत असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - Weight Loss: पोटावर चरबीचा घेर वाढलाय? या 4 प्रकारच्या पिठांचा आहारात करा समावेश मांजरींवर आहे जीव हलिजा यांनी मांजरी हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचं सांगितलं आहे. हलिजा यांच्यासोबत मनी देशविदेशात फिरत असते. दर आठवड्याला तिला ब्युटी पार्लरमध्ये नेण्यात येतं आणि तिची सर्व बडदास्त ठेवण्यात येते. मांजरींशिवाय आपण आपल्या आय़ुष्याची कल्पनाही करू शकत नसल्याचं त्या सांगतात. हलिजा मांजरींना घेऊन टिकटॉकवर एक कार्यक्रमदेखील साजरा करतात. हा कार्यक्रम प्रसिद्ध असून त्यांचे हजारो फॉलोअर्सदेखील आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Cat, Photo viral, Woman

    पुढील बातम्या