मुंबई, 29 जुलै: साडी (Saree) म्हणजे भारतीय महिलांची ओळख. साडीतच महिला सुंदर दिसतात असं म्हटलं जातं. पण याच साडीत वावरणं म्हणजे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नाही. अनेकींना तर साडी नेसून उठणं, बसणं, चालणंही शक्य होत नाही. पण हीच साडी नेसून (Stunt In Saree) काही महिला मात्र असं काही करतात जे पाहूनच शॉक बसतो (Woman Doing stunt In Saree). अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
साडी नेसून एका महिलेनं असं कौशल्य दाखवलं की तुम्ही थक्कच व्हाल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करत नेटिझन्सने तर या महिलेचं कौशल्य पाहून ती ऑलिम्पिकमध्येच असायला हवी असं म्हटलं आहे. आता या महिलेने साडीवर असं कोणतं कौशल्य केलं आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.
व्हिडीओत पाहू शकता, महिलेने आपल्या साडीचा पदर खोचला आणि तिने एका हातावरून दुसऱ्या हातावर अशी गोल फ्लिप (Backflip In Saree) मारली. इथंच ती थांबली नाही तर त्यानंतर ती एकामागोमाग एक असे ब्लॅक फ्लिप मारत गेली.
हे वाचा - इतकं सुंदर दिसणं कसं शक्य आहे? महिलेचा Before-After look पाहून व्हाल शॉक
नितेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने आपल्या फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जय नारीशक्ती असं म्हणत त्यांनी कॅप्शनमध्ये या महिलेने ऑलिम्पिकमध्ये असायला हवं, असं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. नेटिझन्सनी या महिलेचं कौतुक केलं आहे. महिला संधी मिळाली तर काहीही करू शकतात. त्यांना काहीच अशक्य नाही, हेच या व्हिडीओतून दिसून येतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Saree scene, Shocking viral video, Stunt video, Viral, Viral videos, Woman