मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking video! जोशात 167 किलोचं वजन उचलायला गेली तरुणी; हात तुटून धडापासून वेगळा झाला

Shocking video! जोशात 167 किलोचं वजन उचलायला गेली तरुणी; हात तुटून धडापासून वेगळा झाला

जीममध्ये हेवी लिफ्ट करताना तरुणीसोबत भयंकर दुर्घटना घडली (woman injured during weight lifting in gym).

जीममध्ये हेवी लिफ्ट करताना तरुणीसोबत भयंकर दुर्घटना घडली (woman injured during weight lifting in gym).

जीममध्ये हेवी लिफ्ट करताना तरुणीसोबत भयंकर दुर्घटना घडली (woman injured during weight lifting in gym).

मुंबई, 25 जानेवारी : हल्ली बरेच लोक फिटनेस फ्रिक झाले आहेत. फक्त पुरुषच नव्हे तर महिलाही जिममध्ये जाऊ लागल्या आहेत. काही वेळा या तरुणांमध्ये फिटनेसचा इतका जोश चढतो की जोशाजोशात ते आपली अवस्था भयंकर करून घेतात. सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे (Gym Horrific Video). एका तरुणीने तब्बल 167 किलो वजन उचललं आणि त्यानंतर तिचा हातच धडापासून वेगळा झाला (woman arm dislocated from shoulder) .

जीममध्ये हेवी लिफ्ट करताना तरुणीसोबत भयंकर दुर्घटना घडली  (woman injured during weight lifting in gym). हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Gym Accident Video).

नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारी 35 वर्षांची वेटलिफ्टर रोबिन मचाडो जिममध्ये डीप स्क्वॅट करत होती. तिने 369 पाऊंड म्हणजे जवळपास 167 किलो वजन उचललं (woman squating with 167 kg arm weight dislocated). तिने वजन खांद्यावरही घेतलं. पण अचानक तिच्या खांद्यावरून ते स्लिप झालं. इतकं वजन तिच्या डाव्या खांद्यावर पडलं. त्यावेळी ती किंचाळलीसुद्धा. तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे वाचा - तुम्हीही भरभरून Deodorant मारताय? पाहा Nipples वर कसा झाला खतरनाक परिणाम

न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत रोबिनने सांगितलं, त्यावेळी तिचं हाड मोडल्यासारखा आवाज तिला आला. काहीतरी गडबड झाल्याचं तेव्हाच तिच्या लक्षात आल. एक हाड तिच्या त्वचेतून बाहेरच्या दिशेने आल्यासारखं तिला दिसलं. ते पाहून ती घाबरली आणि ओरडू लागली. त्यावेळी फार वेदना झाल्या नाहीत पण एक्स-रेमध्ये किती भयंकर परिणाम झाला होता ते दिसलं.

तिची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले. अखेर तिचा हात जोडण्यासाठी एक प्लेट आणि बरेच स्क्रू लावण्यात आले. तेव्हा तिचा हात पुन्हा शरीराला जोडला गेला. तिची जखम भरण्यात तब्बल 8 आठवडे लागले. तिचा हात खांद्याला स्क्रूने जोडण्यात आला.

हे वाचा - बापरे! काय ही अवस्था; सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर प्रयोग करण्याआधी हा VIDEO पाहा

ही घटना मार्च 2020 मध्ये घडलेली आहे. पण हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतो आहे. रोबिनने आपल्या टिकटॉक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत एक्सरसाईझ करणाऱ्या इतर लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Weight lifting