Home /News /lifestyle /

बापरे! काय ही अवस्था झाली; सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर प्रयोग करण्याआधी हा VIDEO जरूर पाहा

बापरे! काय ही अवस्था झाली; सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर प्रयोग करण्याआधी हा VIDEO जरूर पाहा

आपण सुंदर दिसावं म्हणून तरुणीने चेहऱ्यावर पील ऑफ मास्क लावला पण तो काढताना तिची अवस्था भयंकर झाली.

  मुंबई, 24 जानेवारी : आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. त्यासाठी किती तरी लोक विशेषतः तरुणी वेगवेगळे उपाय करताना दिसतात. चेहऱ्यावर काही ना काही लावत असतात (Beauty treatment). पण काही वेळा हे प्रयोग चांगलेच महागात पडू शकतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Social media viral video). एका तरुणीला सुंदर दिसण्यासाठी केलेला उपाय भारी पडला आहे (Woman crying after applied peel off mask on face). हल्ली बाजारात बरीच सौंदर्यप्रसाधनं उपलब्ध आहेत. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप, फेशिअल किंवा ब्युटी ट्रिटमेंटवर वेळ वाया घालवण्यापेक्षा अगदी घरच्या घरी कमीत कमी वेळेत सुंदर दिसण्यासाठी काही प्रोडक्ट्स वापरले जातात. यामध्ये फेशिअल, पील ऑफ मास्कचाही समावेश आहे. या तरुणीनेही असंच पील ऑफ मास्क वापरलं आणि त्यानंतर तिची अवस्था अक्षरशः भयंकर झाली (Woman crying while removing peel off mask). या तरुणीने उत्साहात आपल्या चेहऱ्यावर पील ऑफ मास्क लावला पण तो काढताना मात्र तिला तिचा जीवही नकोसा वाटला असेल. तिला रडूच कोसळलं. तिच्या घरातील व्यक्तींनीच तिचा हा व्हिडीओ शूट केला जो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि आता व्हायरल होतो आहे. हे वाचा - साधं शरीर हलवूही शकत नव्हता आणि अचानक नाचूच लागला लकवाग्रस्त रुग्ण; पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता तरुणीच्या पील ऑफ मास्क लावण्यात आला आहे. तिच्या चेहऱ्यावरील हा मास्क काढला जातो आहे. पण मास्क काढताना तरुणीची अवस्था भयंकर झाली आहे. तो मास्क चेहऱ्यावर असा चिकटला होता की तो काढण्यासाठी तिला आणखी दोन जणांची मदत घ्यावी लागली.
  मास्क खेचताना तिला वेदनाही होत होत्या. तरुणी वेदनेने किंचाळताना, रडतानाही दिसते. जणू काही या मास्कसोबत तिची त्वचाच निघावी, इतक्या मोठ्याने ती ओरडते आहे. हे वाचा - Shocking! कोरोना लस घेताच वाढली महिलेची ब्रेस्ट साईझ; डॉक्टर म्हणाले... बऱ्याच वेळानंतर तिच्या चेहऱ्यावरील हा मास्क अखेर हटवण्यात आला. punjabi_industry नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आळा आहे. पुन्हा अशी चूक करून नको, असा सल्ला या तरुणीला बहुतेक नेटिझन्सनी दिला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Beauty tips, Lifestyle, Viral, Viral videos

  पुढील बातम्या