जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : विमानाने 6 तासांचा प्रवास, बोर होताच महिलेनं केलं असं काही....

Viral News : विमानाने 6 तासांचा प्रवास, बोर होताच महिलेनं केलं असं काही....

विमानातच मेहंदी काढू लागली महिला

विमानातच मेहंदी काढू लागली महिला

अनेकजण विमानाने प्रवास करतात. काहींची कमी तासांची फ्लाईट असते तर काहींचे तासनतास प्रवासात जातात. त्यामुळे अनेकदा लोक आपला प्रवास सुखकर व्हावा किंवा वेळ सत्कारणी लागावा म्हणून काही ना काही करत बसतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जून : अनेकजण विमानाने प्रवास करतात. काहींची कमी तासांची फ्लाईट असते तर काहींचे तासनतास प्रवासात जातात. त्यामुळे अनेकदा लोक आपला प्रवास सुखकर व्हावा किंवा वेळ सत्कारणी लागावा म्हणून काही ना काही करत बसतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक महिला विमानात बोर झाली म्हणून तिनं तिथेच मेंदी काढायला सुरुवात केली. विमानात अनेक विचित्र घटना समोर येतात. लोक काहीही करताना दिसून येतात. एकापेक्षा एक हटके प्रवासी विमानात असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये महिला प्रवाशाची चर्चा रंगली आहे. महिलेचा वेळ घालवण्याचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला विमानात बसली आहे. तिची 6 तासांची फ्लाईट आहे. आता 6 तास विमानाच्या प्रवासात काय करणार म्हणून ती मेंदी काढायला घेते. ती संपूर्ण हातावर मेंदी काढते. महिलेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.

जाहिरात

@miss_bliss नावाच्या इन्साग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. लोक महिलेच्या जुगाडू वृत्तीचं कौतुक करत आहेत. दरम्यान, विमानातील असे निरनिराळे प्रकार नेहमीच चर्चेत असतात. लोक कधी काय करतील काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर अशा घटना वाऱ्यासारख्या व्हायरल होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात