Home /News /viral /

चालता-बोलताही जाऊ शकतो जीव? रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा VIDEO पाहून हादराल!

चालता-बोलताही जाऊ शकतो जीव? रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा VIDEO पाहून हादराल!

जेवण झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी रेस्टॉरंटच्या काऊंटरवर बिल देण्यासाठी गेला होता.

    बरेली, 5 डिसेंबर : तुम्ही एखाद्या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वाचलं वा पाहिलं असेल, मात्र उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh News) एका व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू झाला की, तुम्ही विचारही करू शकणार नाही. या घटनेचा एक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. येथे एका व्यक्तीचा उभ्या उभ्या मृत्यू झाला. मृत्यूच्या काही सेकंदांपूर्वी ही व्यक्ती खिशातून पर्स बाहेर काढत होती, तेव्हा अचानक झटका येऊन ही व्यक्ती जमिनीवर कोसळली. बरेली जंक्शनवर ट्रेनच्या लायटिंग विभागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही व्यक्ती जेवण झाल्यानंतर रेस्टॉरंट काऊंटवर पैसे देण्यासाठी गेली होती. तेव्हा अचानक झटका येऊन तो खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. हे ही वाचा-पतीने केलेला अपमान लागला जिव्हारी; विवाहितेनं खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या 50 गोळ्या ही घटना शनिवारी रात्री रोडवेअरजवळील एका रेस्टॉरंटमध्ये घडली. रेल्वे कॉलनीत राहणारी ही व्यक्ती जेवण झाल्यानंतर रेस्टॉरंट काऊंटरवर बिल पेमेंट करण्यासाठी पोहोचली होती. तो खिशातून पर्स काढणार तेवढ्यात अचानक त्यांनी झटका आल्यासारखं केलं, आणि ते खाली कोसळले. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी त्याला उचललं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता, या घटनेची सूचना पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनी व्यक्तीला रुग्णालयात हलवलं. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ते 2004 पासून बरेली जंक्शनमधील ट्रेन लायटिंग विभागात फिटर म्हणून काम करीत होते. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Heart Attack, Shocking viral video, Uttar pradesh

    पुढील बातम्या