मुंबई, 09 मे : अजगराला तुम्ही प्रत्यक्षात नाही पण फिल्म किंवा व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिलंच असेल. अजगरा चे किती तरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिकार करतानाही तुम्ही अजगराला पाहिलं असेल. अशाच एका अजगराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. याचं कारण म्हणजे त्याने केलेली शिकार त्याच्याच जीवावर बेतली आहे. अजगराने कधी एखादा माणूस, तर कधी बकरी, हरीण, ससा असे प्राणी गिळल्याचं पाहिलं असेल. पण या अजगराने एक खतरनाक प्राणी गिळला आहे. जो प्राणी खतरनाक शिकारी समजला जातो, त्याच शिकाऱ्याची शिकार कऱण्याचा प्रयत्न अजगराने केला. शिकार करण्यात तो यशस्वीही झाला. पण शिकाऱ्यासोबत शेवटी त्याचाही जीव गेला. अजगरासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक भला मोठा अजगर दिसत आहे आणि त्याच्या पोटात काही तरी असल्याचे दिसत आहे. जेव्हा त्या अजगराचे पोट फाडण्यात येते, तेव्हा त्यामध्ये जे सापडलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. व्यक्तीने पाण्यात डुबकी मारली आणि समोर महाकाय अॅनाकोंडा; पुढचा थरार VIDEO मध्येच पाहा त्याच्या पोटातून जे बाहेर पडलं ते धक्कादायक होतं. या अजगराच्या पोटातून अजगर बाहेर आली. एका मगरीला अजगराने अख्खं गिळलं. पोट फाडून मगरीला बाहेर काढले जाते. पण तोपर्यंत ही मगर मेलेली असते. हा अजगर बर्मी अजगर असल्याचं सांगितलं जातं आहे. जो 18 फूट लांबीचा आहे. त्याने 5 फूट मगरीला गिळलं. बर्मी अजगर जगातील सर्वात मोठ्या अजगरांपैकी एक आहे, ज्याची लांबी 20 फूटांपेक्षा जास्त असू शकते. दक्षिण फ्लोरिडाचे उपोष्णकटिबंधीय हवामानात बर्मी अजगर जास्त जगतात. त्यांच्या कुटुंबाची वेगाने वाढत होते. व्यक्ती आणि विशालकाय अजगराची जबर फाईट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO चा शेवट @TerrifyingNatur ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्ही पाहिलं असेल तर असे कित्येक प्राणी अजगराच्या पोटातून जसेच्या तसे बाहेर काढण्यात आले आहेत. याचं कारण म्हणजे अजगर आपलं भक्ष्य गिळतो. अजगराच्या तोंडात दात असतात आणि ते सुईच्या टोकासारखे टोकदार असतात. पण त्यांचे दात आपल्यासारखं अन्न चघळायला आणि बारीक करायला मदत करत नाहीत. प्रथम ते शिकार इतके घट्ट पकडतात की त्यांचा जीव गुदमरतो. अजगर फक्त आपले भक्ष्य पकडण्यासाठी दात वापरतात आणि नंतर हळू हळू गिळायला लागतात.