जाहिरात
मराठी बातम्या / Viral / व्यक्ती आणि विशालकाय अजगराची जबर फाईट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO चा शेवट

व्यक्ती आणि विशालकाय अजगराची जबर फाईट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO चा शेवट

व्यक्तीने अजगराला पकडलं

व्यक्तीने अजगराला पकडलं

ही व्यक्ती अजगराची मान पकडून त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी अजगर त्याच्या मजबूत आणि लवचिक शरीराने त्या व्यक्तीला गुंडाळून कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 मे : कधी कधी असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात , जे पाहून युजर्सच्या अंगावर काटा येतो. आजकाल एका व्यक्तीचा असाच व्हिडिओ नेटकऱ्यांना घाम फोडत आहे. व्हिडिओ यूजर्सच्या घशाला कोरड घालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत एका विशालकाय अजगराचं तोंड पकडतो आणि त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याचवेळी अजगरही या व्यक्तीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सहसा बरेच लोक जंगल सफारीदरम्यान काही भयानक प्राण्यांचे फोटो काढताना आणि व्हिडिओ बनवताना दिसतात. असेही काही लोक आहेत जे जंगलात जात काही आश्चर्यकारक पराक्रम करतानाही दिसतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस घाबरून पळून जाण्याऐवजी जंगलात एका मोठ्या आणि अवाढव्य अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हे पाहून युजर्सलाही धक्का बसला.

जाहिरात

व्हायरल होत असलेला व्हिडिओ माइक होल्स्टन नावाच्या व्यक्तीच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओतील व्यक्तीच्या धाडसाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही व्यक्ती अजगराची मान पकडून त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी अजगर त्याच्या मजबूत आणि लवचिक शरीराने त्या व्यक्तीला गुंडाळून कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये असं दिसून येतं, की व्यक्ती क्षणभरही आपली पकड कमकुवत करत नाही, ज्यामुळे अजगर त्याच्या प्रयत्नात अयशस्वी होताना दिसतो. सोशल मीडियाच्या इतर अनेक प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत, माईक होल्स्टनच्या इन्स्टाग्रामवर therealtarzann नावाच्या प्रोफाईलवरील व्हिडिओ 37.2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 9 लाख 31 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी तो लाईक केला आहे. त्याच वेळी, वापरकर्ते व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित होत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात