जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बिबट्यापासून वाचण्यासाठी हायनाने लावली अनोखी शक्कल, हा Video एकदा पाहाच

बिबट्यापासून वाचण्यासाठी हायनाने लावली अनोखी शक्कल, हा Video एकदा पाहाच

प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल

प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल

कधीकधी हे शक्तिशाली प्राणी देखील काही प्राण्यांच्या युक्तीपुढे फेल ठरतात. यासंबंधीतचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै : जंगलातील काही शिकाऱ्या प्राण्यांपासून आपले प्राण वाचवण्यासाठी सर्वच प्राणी प्रयत्न करतात. पण असं असलं तरी देखील कधीकधी काही प्राण्यांची शिकार होतेचय जंगलाचा तो नियमच आहे त्यामुळे त्याला कोणीही टाळू शकत नाही. एकाचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याला उपाशी रहावंच लागतं. जंगलाच्या जगात, दुर्बल प्राण्यांनी स्वत:ला बलाढ्यांपासून वाचवण्यासाठी प्रत्येक पावलावर सावध राहणे आवश्यक आहे. कारण कधी, कुठून आणि कोणती आपत्ती येईल हे सांगणे कठीण झाले असते. यासंबंधीचे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन प्राण्यांचे शिकारीचे देखील तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असेल. परंतु असं असलं तरी देखील कधीकधी हे शक्तिशाली प्राणी देखील काही प्राण्यांच्या युक्तीपुढे फेल ठरतात. यासंबंधीतचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये बिबट्यापासून हायनाने आपला जीव वाचवला आहे. इन्स्टाग्रामवर (@latestkruger) नावाच्या अकाऊंटद्वारे ही क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- हायनाने बिबट्याला सहज चकमा दिला. 14 जुलै रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बिबट्या आरामात बसलेला दिसत आहे. तेवढ्यात समोरून एक हायना येताना दिसतो, ज्याला पाहून बिबट्या झोपण्याचं नाटक करतो. बिबट्याला पाहून हायना अजिबात घाबरत नाही आणि पुढे जाऊ लागतो. मग अचानक बिबट्याजवळ जाताना मार्ग बदलतो आणि बिबट्याच्या पुढे निघून आल्यावर पुन्हा आपल्या मार्गाने येतो. हे पाहून असे म्हणता येईल की हायनाने अतिशय हुशारीने त्याचा जीव वाचवला. अन्यथा बिबट्या त्याला एका झटक्यात आपली शिकार बनवू शकला असता. शिवाय बिबट्याचे पोट भरलेले असू शकते किंवा तो खूप थकलेला असल्यामुळे त्याने उठण्याची किंवा शक्ती वाया घालवण्याचा प्रयत्न केला नसावा. कारण काहीही असलं तरी देखील हायनाचे प्राण वाचले हे महत्वाचं.

जाहिरात

यूजर्स या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्ट घेत आहेत. या व्हिडीओला सोशल मीडियावर हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकजण कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले - स्मार्ट हायना. दुसरा म्हणाला - याला म्हणतात स्मार्ट चाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात