मुंबई 3 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्या समोर नेहमीच असे काही व्हिडीओ येत असतात ज्यावर आपल्याला विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन जातं. येथे आपल्याला वाईल्ड लाईफ संदर्भात देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात जे आश्चर्यचकीत करतात. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ देखील तसाच आहे. जे नशीबात असतं तेच घडतं. असं तुम्ही बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकलं असेल. पण आज तुम्ही ते पाहू देखील शकता. कारण या व्हिडीओमधील हरिणासोबत असंच घडलं. व्हिडीओच्या सुरुवातीला हरिण पाण्यात इकडे तिकडे पळताना दिसत आहे. खरंतर पाणी पिण्यासाठी नदीकाठी हरिण आलं पण ते एका मगरीच्या तावडीत सापडलं. ज्यानंतर बरेच प्रयत्न करुन हरणाने आपले प्राण वाचवले आणि तो कसा बसा पाण्यातून बाहेर पडला. हे वाचा : रात्रीच्या अंधारात रस्त्यावर अजगर दिसताच व्यक्तीनं केली अशी गोष्ट, Video पाहून उडेल थरकाप पण या हरणावरील संकट अजूनही टळलेलं नव्हतं. कारण बाहेर जंगलाचा राजा सिंह त्याच्यासाठी तग धरुन बसला होत. जसा हा हरिण पाण्याबाहेर आला. तसं या सिंहाने संधी साधली आणि हरणावर झेप घेतली. ज्यामुळे हा हरिण एका शिकाराच्या तावडीतून सुटला असला तरी देखील, तो दुसऱ्याच्या तावडीत सापडलाच.
— NATURE IS BRUTAL (@TheBrutalNature) September 20, 2022
हा व्हिडीओ Nature is Brutal हा अकाउंटवरुन ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला लोकांनी लाईक आणि शेअर केलं आहे. लोकांना या हरणाच्या नशीबाबद्दल वाईट वाटलं आहे.