मुंबई 27 ऑक्टोबर : प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडिया वर व्हायरल होताना पाहायला मिळतात. यात वाईल्ड लाइफ संबंधीत फोटो किंवा व्हिडीओ पाहायला लोकांना फारच आवडते. यामध्ये कधी थरारक, तर कधी खूपच गोड व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. तर काही व्हिडीओ हे मनाला स्पर्श करुन जातात. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आपण प्राण्यांना आपलं पोट भरण्यासाठी एकमेकांची शिकार करताना पाहिलं असेल. परंतू या व्हिडीओमध्ये हा खेकडा काही विचित्रच वागताना दिसला आहे. ज्यामुळेच हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा खेकडा चक्क आपल्या स्वत:च्याच हाताने आपला दुसरा हात उपटून काढत आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना? पण हे खरं आहे. खेकडा हा त्याचे हात म्हणजेच त्याचे आंगडे स्वत:च्या हाताने काढून फेकत आहे.. हे पाहा : Viral Video : आधी गाईला लाथ मारली मग शेपूट खेचली… त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं हा व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले आहेत आणि खेकडा असं का करत असावा? याबद्दल विचार करु लागले आहेत. चला तर मग जाणून घेऊया खेकड्याशी संबंधित या रंजक गोष्टीबद्दल, ज्याबद्दल अनेकांना अजूनही माहिती नाही. व्हिडीओमध्ये एक खेकडा चालताना दिसत आहे. यादरम्यान, तो असे काही कृत्य करतो, जे कदाचित लोकांनी या आधी कधीच पाहिले नसेल. या व्हिडीओमध्ये खेकडा आपल्या डाव्या हाताने उजवा हात तोडून फेकताना दिसत आहे. यानंतर खेकडा असा काही पुढे जाऊ लागला की जणू काही झालेच नाही.
खेकड्याने स्वत:च्याच हाताने उपटून काढला आपला दुसरा हात, त्याचं हे विचित्र वागणं सगळ्यांनाच आश्चर्यचकित करतंय#ViralVideo #Trending #Shocking pic.twitter.com/dhaMl3eH7O
— News18Lokmat (@News18lokmat) October 27, 2022
व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की खेकड्याने असे का केले? व्हिडीओ पाहिल्यानंतर काही युजर्सनी त्यावर माहिती शेअर केली आहे. असे म्हणतात की निसर्गाने खेकड्याला त्याचे अवयव पुन्हा निर्माण करण्याची क्षमता दिली आहे. म्हणून, ते निरुपयोगी आणि अडथळा आणणारे अवयव उपटून टाकतात. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @OTerrifying नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये खेकड्याचे विचित्र कृत्य सर्वांसाठी धक्कादायक आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 3.2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ 67 हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केला आहे.
काही वापरकर्त्यांच्या मते, खेकडा त्याचे अवयव पुन्हा निर्माण करू शकतो, त्यामुळे जो अवयव खराब होऊ लागला किंवा ब्लॉकेज बनू लागला, तो ते वेगळे करतात.