जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'एकदा एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स...'; गंभीर आजाराने ग्रस्त पत्नीची शेवटची इच्छा ऐकून हादरला पती

'एकदा एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स...'; गंभीर आजाराने ग्रस्त पत्नीची शेवटची इच्छा ऐकून हादरला पती

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिला आता काहीच दिवसांची पाहुणी आहे. ती एका गंभीर आजाराच्या लास्ट स्टेजमध्ये आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन 03 फेब्रुवारी : मृत्यूच्या दारात उभा असलेल्या एका महिलेची शेवटची इच्छा ऐकून तिची पतीलाही धक्का बसला (Weird Last Wish of Wife). पतीने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे, जी सध्या व्हायरल झाली आहे. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की महिला गंभीर आजाराचा सामना करत आहे आणि तिच्याकडे आता जास्तीत जास्त 9 महिने उरले आहेत. मात्र या जगाचा निरोप घेण्याआधी महिलेची एक अशी इच्छा आहे, जी कदाचितच कोणता पती पूर्ण करू शकेल. 20 वर्षांपासून व्हायचा डोकेदुखीचा त्रास; MRI रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले इंडिपेन्डेटच्या रिपोर्टनुसार,महिलेची अखेरची इच्छा आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स करण्याची आहे (Sex With Ex-Boyfriend before Death). जेव्हा तिने आपल्या पतीला याबद्दल सांगितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. महिला आता काहीच दिवसांची पाहुणी आहे. ती एका गंभीर आजाराच्या लास्ट स्टेजमध्ये आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की महिला 4-5 महिले व्हीलचेअरवर राहील आणि आठव्या महिन्यात ती पूर्ण वेळ बेडवरच असेल. व्हायरल पोस्टमध्ये पतीने लिहिलं, ‘आम्ही दोघंही १० वर्षांपासून सोबत आहोत. माझी पत्नी गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिच्याकडे फक्त 9 महिने राहिले आहेत. मी आयुष्यात कधीच असा विचार केला नव्हता की मी तिच्याशिवाय राहू शकेल.’ रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की नुकतंच पत्नीने आपल्या पतीसमोर आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली. महिलेनं म्हटलं की मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत एकदा शेवटचं सेक्स करायचं आहे.

लग्नाच्या एक दिवस आधीच नवरीने दिला बाळाला जन्म; पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक

पत्नीची ही मागणी ऐकून पतीने डोक्याला हात लावला आणि आपलं दुःख सोशल मीडियावर शेअर केलं. या व्यक्तीचं असं म्हणणं आहे, त्याला कळत नाहीये की काय करावं. त्याला आपल्या पत्नीला दुःखात पाहायचं नाही. मात्र जी इच्छा त्याच्या पत्नीने व्यक्त केली आहे, ती पूर्ण करणं त्याच्यासाठी एखाद्या सदम्यापेक्षा कमी नसेल. या व्हायरल पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात