नवी दिल्ली, 30 मे : नवरा बायकोची भांडणं यात काही नाही नाविन्य राहिलं नाही. त्यांच्यातील भांडणं, वाद सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आत्तापर्यंत नवरा बायकोच्या अनेक मजेशीर, विनचित्र, भावुक, धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. नुकतेच राजस्थानमधील भरतपूरमधून एक प्रकरण समोर आले आहे, जेव्हा पती-पत्नीच्या भांडणात पतीने घरात ठेवलेले टॉयलेट क्लीनर प्यायले होते. यानंतर त्यांची प्रकृती इतकी बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
ही घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे राहणारे 48 वर्षीय विनोद जाटव याचं पत्नीसोबत भांडण झालं होतं. तो रोज दारू प्यायचा. शुक्रवारीही याच मुद्द्यावरून नवरा बायकोमध्ये वाद झाला. बायकोने त्याला दारू पिण्यास मनाई केली. यानंतर त्या व्यक्तीला राग आला आणि त्याने पत्नीला धमकावले. हेही वाचा - वृद्धाच्या गळ्याला महाकाय अजगराने घेरलं, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा Video संतापलेल्या विनोदने दारुच्या नशेत टॉयलेट क्लीनर प्यायले, त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. पत्नीने ताबडतोब घरातील इतर लोकांना बोलावले. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, दारुच्या नशेमध्ये अशी धक्कादायक पाऊलं उचलण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. लोक मद्यधुंद अवस्थेत काय करतात याचं त्यांनाच भान नसतं.

)







