नवी दिल्ली, 30 मे : साप, नाग, अजगर हे खूप धोकादायक प्राणी आहेत. त्यांना पाहिलं तरी अंगावर काटा उभा राहतो. त्यांच्या जवळ जाणं तर लांबचीच गोष्ट. अजगर हा विषारी नसला तरी तो सापांपेक्षा अधिक धोकादायक आहे. त्याच्या पिळ्यात अडकलं की सोडवणं खूपच कठिण होतं. सोशल मीडियावर या धोकादायक प्राण्यांचे व्हिडीओ गराळा घालत असतात. अशातच यामध्ये आणखी भर पडली असून अजराचा एक थरारक व्हिडीओ समोर आलाय. एका वृद्धाला महाकाय अजगराने मानेला घेरलं. त्याच्यापासून सुटका करणंही खूप कठिण झालं. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.
या व्हिडिओमध्ये एका वृद्धाच्या गळ्यात एक महाकाय अजगर दिसत आहे. तो त्याची गळचेपी करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अजगर किती मोठा आहे आणि त्याने वृद्धाचा गळा पकडला आहे. एक मुलगा अजगराला त्याच्या मानेतून सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला शक्य होत नाही. तेवढ्यात दुसरा मुलगा तिथे येतो आणि ते दोघे मिळून त्या माणसाच्या गळ्यातील अजगर काढण्याचा प्रयत्न करतात. पण सर्व प्रयत्न करूनही ते अजगर त्याच्या मानेतून निघत नाही.
Kalesh b/w Python snake and an Old man pic.twitter.com/uQ1BqE9dip
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 27, 2023
हे दृश्य खरोखरच थक्क करणारं आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 44 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 95 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक करत विविध कमेंट्सही केल्या आहेत.

)







