नवी दिल्ली 07 जुलै : पती-पत्नीचं नातं हे अतिशय खास असतं. पती-पत्नीमध्ये प्रेम राहिलं तर जवळीकही कायम राहते आणि दोघंही एकमेकांचा आधार घेत आयुष्य सुखात घालवतात. मात्र, दोघांच्यातील एकानेही दुसऱ्याची फसवणूक केली तरी त्यांना लगेचच याची कल्पना येऊ लागते. इंग्लंडमधील एका महिलेला देखील असंच वाटलं, जेव्हा तिचा नवरा तिच्यापासून हळूहळू अंतर ठेवू लागला. तो आपल्या बायकोशी फारसा बोलत नसे, त्यामुळे आपल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत, असं तिला वाटू लागलं. पण जेव्हा पत्नीला आपल्या पतीचं सत्य समजलं तेव्हा तिला धक्का बसला आणि तिला स्वतःचाच राग येऊ लागला. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 55 वर्षीय एमा रस्को आणि 58 वर्षीय सायमन हे दोघंही सामान्य पती-पत्नीसारखंच आयुष्य जगत होते. परंतु 2015 मध्ये दोघांमध्ये खूप गैरसमज निर्माण झाले. एमाचा नवरा सायमनचं वागणं खूप बदलू लागलं. त्याने त्याच्या मित्रांसोबत कुठेही फिरायला जाणं बंद केलं. तो एमा पासून सुद्धा लांब राहत असे. इतकंच नाही तर 2016 मध्ये जेव्हा पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं ग्रीसला सुट्टी घालवण्यासाठी गेले होते, तेव्हा सायमनचं वागणं एकदम वेगळं होतं. तो मुलांशी भांडायचा आणि नंतर विसरून जायचा. गाडी चालवताना वळण घ्यायलाय विसरायचा. सुनेनं सासऱ्याला रस्त्यावर पळवत लोखंडी रॉडने मारलं, बघ्यांची गर्दी पण.., संतापजनक Video हे पाहून एमाला वाटू लागलं, की सायमनला आता तिच्यात काहीही रस राहिलेला नाही . पण जेव्हा तिने डॉक्टरांना दाखवलं तेव्हा 2020 मध्ये सायमनला स्मृतिभ्रंश झाल्याचं आढळून आलं. हे ऐकून एमाच्या पायाखालची जमीनच सरकली. डिमेंशिया ग्रस्त व्यक्ती एकाकी राहणं आणि लोकांशी कमी संवाद साधणं पसंत करतात. गाडीतून रस्त्याने चालताना ते रस्ते किंवा इतर गोष्टी विसरू लागतात.
एमा म्हणाली, की तिला समजलं होतं की तिच्या पतीला काहीतरी समस्या आहे, परंतु लोकांनी तिचं ऐकले नाही. 2018 मध्ये पतीची तपासणी झाली, तेव्हा डॉक्टरांनी स्मृतिभ्रंश असल्याचं नाकारलं. परंतु 2020 मध्ये स्मृतिभ्रंश झाल्याचं आढळल्यानंतर, एमाला वाईट वाटलं, परंतु पतीची समस्या समजल्याने तिला समाधानही वाटलं. स्मृतिभ्रंशाचे निदान झाल्यानंतर देशात लॉकडाऊन झालं. त्यामुळे पतीवर घरीच उपचार सुरू होते. ते अजूनही पूर्णवेळ घरी आणि त्यांच्या मुलांमध्ये राहतात. एमा म्हणते की डिमेंशियामुळे तिचा जोडीदार दररोज कमजोर होताना पाहून तिला खूप त्रास होतो.