मुंबई, 14 सप्टेंबर: गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षांपासून IT सेक्टरमधील (IT sector Jobs) सर्व करणचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. भारत रेकॉर्ड लसीकरण (Vaccination in India) करत आहे आणि जेव्हा लोकसंख्येचा मोठा भाग लसीकरण झाला आहे, त्यामुळे आता देशातील अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलण्याचा निर्णय घेतला आहे.
काही कंपन्या आपल्या कर्मचार्यांना पुन्हा कार्यालयात यायला सांगत आहेत नाहीतर हायब्रिड कार्यशैली (Hybrid) अंगीकारण्यास सांगत आहेत, जिथे एखाद्याला घरून 2-3 दिवस काम करणं अपेक्षित आहे तर त्यानंतरचे 2-3 दिवस कार्यालयातून काम करावं लागणार आहे. यात काही कंपन्या आहेत.
Wipro
देशातील कंपनी Wipro मध्ये लवकरच वर्क फ्रॉम होम बंद होणार आहे कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवलं जाणार आहे. मात्र त्याआधी कामोणीतील सर्व कर्मचाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे की नाही याबाबत खात्री करून घेतली जाणार आहे. तसंच कंपनीमध्ये शरीराचं तापमान तपासणी केली जाणार आहे.
हे वाचा - #CareersInAmazon: आजपासून सुरु होणार Amazon Job Fair; भारतात देणार 10 लाख Jobs
TCS
भारतातील सॉफ्टवेअर जायंट 80 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम सुरू करण्यासाठी परत बोलावण्याची योजना आखत आहे. कंपनीने म्हटले आहे की त्याच्या जवळजवळ 90 टक्के कर्मचारी लसीकरण करत आहेत. अगदी TCS, TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनीच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत आणण्याच्या योजनेबद्दल प्लॅन करत आहेत.
Infosys
आपली कार्यालये पुन्हा सुरू करण्याची आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयातूनच कामावर परत आणण्याचे नियोजन करत आहे. साथीच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात ठेवून कंपनी कार्यालयात बोलवण्याची योजना करत असलेल्या 2.6 लाख कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करत आहे.
तसंच HCL, Nagarro यांसारख्या कंपन्याही लवकरच Work From Home बंद करणार आहेत आणि आपल्या कारंचार्यांना पुन्हा ऑफिसमध्ये कामावर बोलावणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: TCS chairman