मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अवलियाच आहे! महिंद्राच्या स्कॉर्पियोवर जडला बायकोचा जीव; नवऱ्याने बिल्डिंगच्या गच्चीवरच केलीये पार्क

अवलियाच आहे! महिंद्राच्या स्कॉर्पियोवर जडला बायकोचा जीव; नवऱ्याने बिल्डिंगच्या गच्चीवरच केलीये पार्क

गच्चीवर पार्क केलेली ही गाडी पाहून सर्वजण अचंबित होत आहेत

गच्चीवर पार्क केलेली ही गाडी पाहून सर्वजण अचंबित होत आहेत

गच्चीवर पार्क केलेली ही गाडी पाहून सर्वजण अचंबित होत आहेत

    भागलपुर, 25 ऑक्टोबर : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections 2020) महिंद्राची स्काॅर्पियो (Scorpio) गाडी नेत्यांच्या आवडीची आहे. बिहारच्या ररस्त्याच्या अवस्थेमुळे या गाडीची मोठी विक्री होते. लॉकडाऊन आणि आर्थिक मंदी असतानाही बिहारमध्ये प्रत्येक महिन्याला साधारण 3 हजार गाड्या विकल्या जात आहेत. काहींसाठी ही लक्झरी आहे तर काहींसाठी बिहारच्या रस्त्यावर चालविण्यासाठी याच्याहून मजबूत गाडी दुसरी नाहीच. काहींची इच्छा आणि तर काहींसाठी स्कॉर्पिओ चालविणे ही आवड. भागलपूर जिल्ह्यात 100 हून अधिक गाड्यांची मागणी आहे. मात्र ही मागणी जास्त असल्याने  गाडीचे डिलर हे पूर्ण करू शकत नाहीत. तारापुर विधानसभाचे उमेदवार जीतेंद्र कुमार हेदेखील भाड्याच्या स्कोर्पियोवर फिरत आहेत. तर एका व्यक्तीला ही गाडी इतकी आवडली की त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर स्कॉर्पिओ उभी केली आहे. ज्या व्यक्तीने आपल्या घरावर ही स्कॉर्पियो गाडी तयार केली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे इंतसार आलम. इंतसार भागलपुर जिल्ह्यात सबौर भागात राहतो. स्कॉर्पियो ही त्यांची पहिली गाडी होती. त्याच्या प्रेमासाठी त्यांनी बिल्डिंगच्या वर स्कॉर्पियो डिजायनची गाडी तयार केली आहे. हे ही वाचा-औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार; डोळे बाहेर येईपर्यंत कुत्र्याला काठीने मारलं इंतसार यांची पत्नी आग्राला गेली आहे. त्यात त्यांच्या पत्नीला ही डिजाइन खूप आवडली. विशेष म्हणजे आग्राच्या मिस्त्रीने ही डिजाइन बनवूनही दिली. इंतसार यांनी सांगितले की,  अडीच लाखांमध्ये त्यांनी स्कॉर्पिओचं हे डिजाइन बनवून घेतलं आहे. त्यांनी बिल्डिंगच्या गच्चीवर लावलेल्या या गाडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बिहारमधील अनेकांना याबाबत माहिती आहे. मात्र येथे नवीन येणारी व्यक्ती गच्चीवर उभी असलेली ही गाडी पाहून अचंबित होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Photo viral, Tech Mahindra

    पुढील बातम्या