जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बायकोला तुमचा राग येतो का? ही असू शकतात कारणे, वेळीच व्हा सावध

बायकोला तुमचा राग येतो का? ही असू शकतात कारणे, वेळीच व्हा सावध

व्हायरल

व्हायरल

पती पत्नीचं नातं हे अतिशय गुंतागुंतीचं असतं. हे नातं सर्वात नाजूक असतं. त्यामुळेच या नात्यात विश्वास, संयम, समजूतदारपणा, प्रेम या गोष्टींची आवश्यकता असते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 12 एप्रिल : पती पत्नीचं नातं हे अतिशय गुंतागुंतीचं असतं. हे नातं सर्वात नाजूक असतं. त्यामुळेच या नात्यात विश्वास, संयम, समजूतदारपणा, प्रेम या गोष्टींची आवश्यकता असते. पण काही कारणांमुळे पती-पत्नी यांच्या नात्यातील प्रेमाची जागा भीती आणि द्वेष घेते. अशावेळी पत्नी पतीपासून वेगळा होण्याचा विचार करू लागते. पत्नीला पतीपासून दूर करणारी ही कारणं नेमकी कोणती आहेत, याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. वैवाहिक जीवनात प्रेमाला खूप महत्त्व आहे. पती-पत्नीमधील समजूतदारपणा, प्रेम आणि चांगला संवाद त्यांना कायम एकत्र ठेवतो; पण काही कारणांमुळे या नात्यातील गोडवा कमी होऊ शकतो. ज्या पतीसाठी मुलगी लग्नानंतर तिच्या आई-वडिलांचं घर सोडून आली असते, त्याच पतीपासून दूर राहण्याचा ती विचार करू लागते. चला तर, पत्नीला पतीपासून दूर करणारी नेमकी कारणं कोणती आहेत, ते जाणून घेऊ. मारहाण करणं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पतीने जर पत्नीला मारहाण केली, तर पत्नीला पतीचा राग येणं, त्याच्याबद्दल द्वेष वाटणं स्वाभाविक आहे. मुळात घरगुती हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाऊ नये. यासाठी काही कायदेही आहेत, जे या परिस्थितीत महिलांना संरक्षण आणि न्याय देण्यास मदत करतात. मानसिक छळ करणं छळ हा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकही असतो. मानसिक छळामुळे एखादी महिला अशाप्रकारे तुटते की ती आयुष्यभर त्यातून सावरू शकत नाही. त्यामुळे पतीने जर त्याच्या पत्नीचा मानसिक छळ केला, तर त्याच्याबद्दल पत्नीचा मनात प्रेम राहत नाही. मुलांबद्दल हिंसक वर्तन पती-पत्नीमध्ये सर्व काही ठीक आहे, असं अनेकवेळा दिसून येतं. परंतु जेव्हा एखाद्या पुरुषाचे वागणे हे बाप म्हणून त्याच्या मुलांबाबत हिंसक असते, तेव्हा असे वागणे देखील एखादे नाते तोडण्यास पुरेसे ठरते. मुलांसोबत हिंसक वृत्ती, कोणत्याही महिलेला सहन करणे अशक्य असते. अशावेळी अनेक स्त्रिया पतीपासून वेगळे होऊन मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतात. हेही वाचा -  ड्रिंक करण्यापूर्वी ‘चीअर्स’ का म्हणतात? काय आहे कारण फसवणूक करणं कोणत्याही नातेसंबंधात, प्रेमासोबतच अधिक महत्त्वाचं असतं ते जोडप्याची एकमेकांबद्दलची प्रामाणिकता. हा असा पाया आहे, ज्याच्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत पती आपली फसवणूक करत असल्याचं पत्नीला कळलं, तर ती कधीही ते सहन करीत नाही. यामुळे ती दुखी होतेच, शिवाय तिच्या प्रेमाचं रुपांतर द्वेषात होतं. दरम्यान, पती पत्नीच्या नात्यातील गुंतागुंत समजून घेतल्यास हे नातं निभावणे सहज शक्य आहे. एकमेकांच्या विचारांना आणि मतांना स्थान देत आदर राखल्यास नात्यात गोडवा टिकून राहतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात