मराठी बातम्या /बातम्या /Viral /व्हायोलिनच्या बहाण्याने पळवून नेलं, 6 महिन्यांनी विद्यार्थिनीसोबत पकडलं या अवस्थेत; बायकोनेही घेतला बदला

व्हायोलिनच्या बहाण्याने पळवून नेलं, 6 महिन्यांनी विद्यार्थिनीसोबत पकडलं या अवस्थेत; बायकोनेही घेतला बदला

फोटो - सोशल मीडिया

फोटो - सोशल मीडिया

विद्यार्थिनीसोबत गायब झालेल्या च्या पतीने आपल्या चार वर्षांच्या मुलालाही फोन केला नाही. गेल्या ६ महिन्यांपासून त्याचा नंबर संपर्काच्या बाहेर होता.

चांगी (सिंगापूर), 14 ऑगस्ट : विद्यार्थिनीसह बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तो घरातून न सांगता बेपत्ता झाला होता. या काळात त्याने ना पत्नीची काळजी घेतली ना मुलाची. मात्र अलीकडेच त्याच्या पत्नीने त्याला विमानतळावर एका विद्यार्थिनीसोबत पकडले. यानंतर पत्नीने फसवणूक करणाऱ्या नवऱ्याला आपल्या शैलीत धडा शिकवला.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

एक पत्नीने आपल्या पतीला एका विद्यार्थिनीसोबत थेट विमानतळावरच पकडले आहे. या विद्यार्थिनीला हा व्यक्ती व्हायोलिन शिकवायचा. मागच्या सहा महिन्यांपासुन तो गायब होता. या कालावधीमध्ये त्याने त्याच्या पत्नीला एक कॉलही नाही केला. त्यामुळे त्याला रंगेहात पकडण्याची योजना त्याच्या पत्नीने आखली होती. याचदरम्यान, जेव्हा तिला बातमी मिळाली की, तो आपल्या विद्यार्थिनीसोबत चांगी विमानतळावरुन कुठे जात आहे. यानंतर ती महिला लगेचच तिथे पोहोचली आणि त्या दोघांना तिने रंगेहात पकडले.

डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने पतीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने तिलाही खडसावले. ती म्हणाली, 'माफ करा, मी माझ्या पतीसोबत बोलत आहे. तू कोण आहेस, गेल्या ६ महिन्यांपासून कुठे गायब होते?' यावर दोघेही गप्प होते. महिला आपल्या पतीला ओरडत होती आणि तिचा पती शांतपणे तिचे बोलणे खात होता.

महिलेने सांगितले की, विद्यार्थिनीसोबत गायब झालेल्या च्या पतीने आपल्या चार वर्षांच्या मुलालाही फोन केला नाही. गेल्या ६ महिन्यांपासून त्याचा नंबर संपर्काच्या बाहेर होता. मलेशियात एक मुलगा आणि पत्नी त्याची वाट पाहत आहेत, हे त्याने विसरायला नको होते. तसेच या महिलेने दावा केला की, तिचा नवरा 2021 च्या शेवटी नोकरीच्या मुलाखतीसाठी मलेशियाबाहेर गेला होता. पण तेव्हापासून तो घरी परतला नाही.

हेही वाचा - दिल्लीतील या भिकाऱ्याला पाहून भलेभले चक्रावले.. पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का

महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा मला माझ्या मुलाने विचारले की, त्याचे वडील कुठे आहे तर ते पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करत आहे, असे त्याला सांगते. मात्र, पतीने जे केलं, त्यामुळे मला त्रास झाला आहे. दरम्यान,पतीच्या या कृत्यामुळे या महिलेने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Singapore, Wife and husband