जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दिल्लीतील या भिकाऱ्याला पाहून भलेभले चक्रावले.. पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का

दिल्लीतील या भिकाऱ्याला पाहून भलेभले चक्रावले.. पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का

फोटो क्रेडिट - ट्विटर

फोटो क्रेडिट - ट्विटर

एका भिकाऱ्याचा फोटो असणारे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 13 ऑगस्ट : तुम्ही अनेक भिकारी भिक मागताना पाहिले असतील. जेव्हा तुम्ही सिग्नलवर गाडी थांबवली असेल, किंवा बस स्टॉपवर, रेल्वे स्थानकावर तुम्हाला भिकारी म्हणून लहान मुले, मुली, किंवा अनेक स्त्री, पुरुष दिसले असतील. त्यांची अवस्था अनेकदा फाटलेल्या, मळलेल्या कपड्यांमध्ये असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका भिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. या भिकाऱ्याचा फोटो आणि अंदाज पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. काय आहे नेमकं प्रकरण - एका भिकाऱ्याचा फोटो असणारे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोत दिसणारी व्यक्ती भिकारी नसून मॉडेल असल्याचे सोशल मीडिया यूजर्सला वाटते आहे. तसेच काही लोक तर भिकाऱ्याची तुलना मोठ्या मॉडेल्स आणि नायकांशी करू लागले आहे. याचे कारणही खास असून शेवटी हा फोटोच तसा आहे.

जाहिरात

हा फोटो पाहून अनेकजण गोंधळलेले दिसले. हा भिकारी आदित्य रॉय कपूर, हृतिक रोशन आणि पुष्पा यांच्या अल्लू अर्जुनसारखा दिसतो, असेही काहींनी म्हटले आहे. तर अनेक ट्विटनुसार, फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती भिकारी असू शकत नाही. तर ती व्यक्ती भिकारी आहे की नाही याचा दावा करता येत नाही. मात्र, फोटो पाहिल्यानंतर अनेक जणांना स्वत:ला प्रतिक्रिया देण्यापासून रोखता आले नाही. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक आणि रिट्विट केले आहे. इतकेच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने सांगितले की, तो स्वॅगने भीक मागणार तर दुसरा म्हणाला की आधुनिक भिकारी. हेही वाचा -  Shocking Video : मुलाने चुकून ठेवला पाय; फणा काढलेल्या कोब्र्यापासून आईने लेकाला असं वाचवलं!   भिकाऱ्यांची असहायता समजून त्यांना पैसे दिले पाहिजेत, असे काही लोकांचे मत आहे, तर काही लोकांचे म्हणणे आहे की पैसे दिल्यावर हे लोक मेहनतीने कमावण्याचा प्रयत्न करणार नाहीत. दरम्यान, याप्रकारच्या मत मतांतरे व्यक्त होत असतात. त्यामुळे या वादाला अंत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात