लंडन, 19 ऑक्टोबर : नवरा-बायको म्हटलं की त्यांच्यातील प्रेमाप्रमाणे त्यांच्यात भांडणंही आलीच. पती-पत्नीमधील भांडणं ही नवी नाहीत. बऱ्याच वेळा घरातील कामांवरूनच कपलमध्ये वाद होतात. नवरा घरातील कामं करत नाही, अशी तक्रार तर कित्येक बायकांची असते. आपल्या नवऱ्याविरोधात अशीच तक्रार करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. ती स्वतःच तुरुंगात पोहोचली आहे.
यूकेच्या मेलवर्नमध्ये राहणारी 61 वर्षांची शॅरन टेलर तिचा नवरा डेव्हिड. दोघांच्याही लग्नाला 21 वर्षे झाली आहेत. एक दिवस शॅरनने डेव्हिडलं आपलं एक सत्य सांगितलं. बायकोबाबत नवऱ्याला असं काही समजलं ही पुरता हादरला. त्यानंतर त्या दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदललं. शॅरनने डेव्हिडला सांगितलं की, ती त्याला फसवते आहे. तिचं दुसऱ्या कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. हे वाचा - VIDEO - नवरीसमोर अति उत्साह, जोश पडला महागात; लग्नाच्या दिवशीच नवरदेव रुग्णालयात हे ऐकल्यानंतर डेव्हिड नाराज झाला. ते दोघं ज्या घरात राहत होते, ते घर त्याने सोडलं. गेल्या वर्षीपासून तो तिच्यापासून दूर वेगळा राहू लागला. शॅरनला हे आवडलं नाही. आपलं सत्य समजल्यानंतरही डेव्हिडने आधीसारखंच आपल्या घरातील काम करावं असं तिला वाटत होतं.
या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये शॅरनने डेव्हिडला जवळपास 216 मेसेज पाठवले. त्यात ती त्याला खूप वाईट वाईट काही बोलली. इथवरच ती थांबली नाही. जिथं डेव्हिड नोकरी करायचा त्या पोस्ट ऑफिसमध्ये गेली. डेव्हिडच्या बॉसला तिने आपला नवरा गेल्या कित्येक वर्षांपासून आपला बलात्कार करत असल्याचं सांगितलं. डेव्हिडवर ती सातत्याने रेपचा आरोप करत राहली आणि त्याला नोकरी सोडावी लागली. त्याचवेळी जर आपलं ऐकलं नाही तर आपण पोलिसात तक्रार देऊ अशी धमकीही तिने डेव्हिडला दिली. डेली स्टार न्यूच्या रिपोर्टनुसार वॉरसेस्टर क्राऊन कोर्टात हे प्रकरण पोहोचलं. नवऱ्याची तक्रार करणाऱ्या शॅरिनलाच कोर्टाने शिक्षा दिली. तिला दोन ते तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. 30 दिवसांसाठी तिला रिहॅबिलेटेशनलाही पाठवण्यात आलं. तिला नवऱ्याला भेटण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे वाचा - विवाहित पुरुष करत होता दुसरे लग्न, पत्नीला समजताच उचललं मोठं पाऊल महिला पतीला सलग मेसेज पाठवत होती. ज्यात ती त्याला घरातील कामं करायला सांगत होती. सोबतच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकीही देत होती, असं सांगत कोर्टाने शॅरनला ब्लॅकमेल करत असल्याच्या आरोपात दोषी ठरवलं.