नवी दिल्ली, 22 जानेवारी : लग्न हे एक पवित्र बंधन आहे. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंबेदेखील एकत्र येतात. त्यामुळे लग्न समारंभाचे खूप खास महत्त्व असते. लग्नाच्या प्रत्येक विधीचे काहीतरी विशेष, खास कारण असते. यातीलच एक खास विधी म्हणजे महिलांच्या भांगेत कुंकू, सिंदूर लावतात. जे की महिला लग्नानंतरही कायमच सिंदूर लावताना दिसून येतात. मात्र यामागे नेमकं काय धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे याविषयी तुम्हाला माहित आहे का?
विवाहित महिला भांगेत कुंकू, सिंदूर लावतात मात्र त्यामागे काय कारण असतं हे आपण आज जाणून घेणार आहोत. विवाहित आणि भाग्यवान असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगेत लावला जाणारा सिंदूर. भारतात सौभाग्यवतीचं लक्षण म्हणून कुंकू म्हणजेच सिंदूरकडे पाहिलं जातं. त्यामुळे महिला लग्नानंतर सिंदूर लावतात. सिंदूर विवाहिताचे निशाणी असल्यामुळे अविवाहित मुली हे लावू शकत नाही.
हेही वाचा - Husband शब्दाचा अर्थ काय? नेमका कुठून आला हा शब्द
हिंदू धर्मात सिंदूर लावण्याची परंपरा फार जुनी आहे. महाभारत आणि रामायणातही याचा उल्लेख केलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती देखील सिंदूर लावत असे. तेथे महाभारत महाकाव्यात सिंदूराचा उल्लेख आढळतो. एके दिवशी माता सीता श्रृंगार करताना आपली भांग भरत होती, तेव्हा तिथे उभ्या असलेल्या हनुमानजींनी तिला विचारले, आई, तू भांगामध्ये सिंदूर का घालते आहेस? तेव्हा सीताजींनी हनुमानजींना सांगितले की, यामुळे माझे आणि भगवान श्रीरामांचे नाते दृढ होते आणि श्रीराम दीर्घायुष्यी बनतात. हे ऐकून हनुमानजींना वाटले की जर फक्त एक चिमूटभर सिंदूर श्रीरामांना दीर्घायुष्य देऊ शकेल तर संपूर्ण अंगावर सिंदूर लावल्याने ते अमर होतील आणि अशा प्रकारे हनुमानजींनी आपल्या अंगावर सिंदूर लावला. सिंदूर लावण्याची परंपरा रामायण काळातही होती हे या संदर्भावरून सिद्ध होते.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून महिलांनी सिंदूर लावणे शरीराशी संबंधीत आहे. सिंदूरमध्ये बुध धातू आढळतो, जो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो. यामुळे महिलांना मानसिक ताण कमी होतो. सिंदूर लावल्यामुळे शरीराचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Top trending, Viral, Viral news