जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'पापा की परी'च्या गप्पा काही संपेना; जिममध्ये सर्वांसमोर झालं हसू, पाहा VIRAL VIDEO

'पापा की परी'च्या गप्पा काही संपेना; जिममध्ये सर्वांसमोर झालं हसू, पाहा VIRAL VIDEO

'पापा की परी'च्या गप्पा काही संपेना; जिममध्ये सर्वांसमोर झालं हसू, पाहा VIRAL VIDEO

एका जिममध्ये ट्रेडमिलवर वॉल करीत असताना तरुणीसोबत हा सर्व प्रकार घडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही घटना, प्रसंग सीसीटीव्हीमधून टिपलेले तर काही मोबाइलमधून शूट केलेले व्हिडीओ मोठ्या संख्येने पाहिले जातात. त्यात मोबाइल हा आपला सांगाती झाल्यापासून तर हवं तेव्हा जगाची माहिती मिळवू शकतो. त्यात असे व्हिडीओ लोकांचं मनोरंजनही करीत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Funny Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ एका जिममधील असल्याचं दिसत आहे. काही जणी ट्रेडमिलवर वॉक करीत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे ट्रेडमिलवर वॉक करीत असतानाही या तरुणींच्या गप्पा मात्र सुरूच आहे. मात्र याचा फटका त्या तरुणीला सहन करावा लागला आहे. काही महिलांना गप्पा मारायला खूप आवडतं. अगदी तासन् तास या गप्पा मारण्याचा रेकॉर्ड करू शकतात, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र वेळोवेळी या अतिरेकाचे परिणामही भोगावे लागू शकतात. जसं शाळेत वर्गात शिक्षक शिकवित असतानाही गप्पा मारणाऱ्या मुलींकडे नेहमीच शिक्षकांची नजर असायची आणि त्यांच्या तावडीत सापडले तर शिक्षा ही आलीच. तसंच या तरुणीलाही ट्रेडमिलवर चालत असताना गप्पा मारण्याचा फटका सहन करावा लागला. हे ही वाचा- आनंद महिंद्रांनी VIDEO शेअर करुन विचारले सवाल; माहिती आहे का उत्तर?

त्याचं झालं असं की बोलता बोलता या तरुणाचा तोल सुटला. मशिन सुरू असल्यामुळे ती स्वत:ला सावरू शकली नाही आणि मशीनच्या पट्ट्यासोबत तीदेखील खाली सरकली. दरम्यान ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र ते काही तिला शक्य झालं नाही. या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे तरुणीला खाली पडली तरी तिला मदतीला कोणीच आलं नाही. उलटं तिच्या शेजारी असलेली तरुणीही काही करू शकली नाही. स्वत:ला सावरल्यानंतर तरुणी जसा बावरली. मात्र पुन्हा ती ट्रेडमिल जात असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा सर्व प्रकार एका जिममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात