• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIDEO पाहून बोलती बंद होईल, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं आहे का उत्तर?

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIDEO पाहून बोलती बंद होईल, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं आहे का उत्तर?

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही काही सुचणार नाही..

 • Share this:
  मुंबई, 16 ऑगस्ट : सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या नावाला एक वेगळच वलय आहे. त्यामुळे कामात व्यग्र असतानाही ते सोशल मीडियावर आपले विचार शेअर करतात. ते पोस्ट करतात त्यात एक चांगला संदेश असतो. त्यांनी आतापर्यंत केलेले ट्वीट्स पाहिले तर लक्षात येईल ते कधीही आपले विचार सोशल मीडियावर व्यक्त करण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे वाचक आणि त्यांचे चाहते आवर्जुन त्यांनी केलेली पोस्ट लक्ष देऊन वाचतात. ( Anand Mahindra on social media) नुकताच आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मजूर डोक्यावर विटा घेऊन जात आहे. यावेळी त्याने भरपूर विटा एकाचवेळी डोक्यावर घेतल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती एक एक करीत विटा आपल्या डोक्यावर ठेवत आहे. हा व्हिडीओ कोणा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचा वाटत आहे. आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे आणि व्हिडीओ पोस्ट करण्याबरोबरच मनाला स्पर्शून जाणारं कॅप्शन दिलं आहे. यात ते म्हणतात की, मजुरांचं आयुष्य खूप आव्हानात्मक असतं. काय म्हणाले आनंद महिंद्रा.. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, कोणालाही अशा प्रकारे धोकादायक शारिरीक श्रम करावा लागू नये. मात्र या व्यक्तीच्या मेहनतीचं एक कौशल्य वा कलेच्या रुपात नक्कीच कौतुक करायला हवं. हा व्हिडीओ कुठला आहे? कोणाला याबद्दल माहिती आहे? तेथील मजुरांना ऑटोमॅटिक मशीन उपलब्ध करून दिली जाऊ शकते आणि त्यांच्या कौशल्याला योग्य दिशी दिली जाऊ शकते? हे ही वाचा-तुम्हीही वारंवार जॉब बदलता का? यामुळे तुमच्या प्रोफाईलचं होऊ शकतं हे नुकसान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक ट्वीटर युजरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: