मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : शिकवणी घेताना LED TV वर असं काही सुरू झालं की, मुलींनी खाली घातली मान...

VIDEO : शिकवणी घेताना LED TV वर असं काही सुरू झालं की, मुलींनी खाली घातली मान...

सर ट्यूशनच्या वर्गात शिकवत होते, त्यावेळी असं काही घडलं की, विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ सुरू केला.

सर ट्यूशनच्या वर्गात शिकवत होते, त्यावेळी असं काही घडलं की, विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ सुरू केला.

सर ट्यूशनच्या वर्गात शिकवत होते, त्यावेळी असं काही घडलं की, विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ सुरू केला.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : जेव्हापासून कोरोना (CoronaVirus) आला आहे, तेव्हापासून सर्व परिस्थिती बदलली आहे. नोकरीवर जाणारे लोक वर्क फ्रॉर्म होम करीत आहे. अभ्यास करणारी मुलं मग ती शाळा असो वा ट्यूशनमधील सर्वजण ऑनलाइन शिक्षण (Online Education) घेत आहे. मात्र आता कोरोनाचा परिणाम हळू हळू कमी होत असल्यामुळे तस तसं ऑफिस, शाळा आणि ट्यूशन पुन्हा सुरू होत आहेत. याच्याशी संबंधित एक ट्यूशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...

काय झालं होतं ट्यूशनमध्ये?

इंटरनेटवर विविध प्रकारचे व्हिडीओ (Viral Video) आणि फोटो व्हायरल होत असतात. येथे अनेकदा असेही व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आपण भावनिक होतो. तर कधी असं काही पाहायला मिळतं की ते पाहून आपण हसू आवरू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि पोट धरून हसाल.

हे ही वाचा-आईचं कर्ज नाही, तर तिचं EMI फेडतोय 7 वर्षांचा चिमुरडा; कसं? पाहा VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्यूशनच्या हॉलमध्ये अनेक विद्यार्थी बसलेले आहेत. आणि एक टीचर एका विषयाबद्दल त्यांना समजावत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही भिंतीवर लावलेली एलइडीदेखील पाहू शकता. हा एलईडी विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय किंवा इतर बाबी समजावण्यासाठी लावला आहे. मात्र या एलईडीवर एक विचित्र प्रकार घडतो. जो पाहिल्यानंतर तेथे बसलेली मुलं आणि व्हिडीओ पाहणारे जोर जोरात हसू लागतात. तर पाहूया काय आहे त्या व्हिडीओमध्ये...

व्हायरल झाला व्हिडीओ..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यात एक गाणं सुरू आहे. हे गाणं मालिकेतील असल्याचं सांगितलं जात आहे. अचानक वर्गासमोर एक रोमँटिक गाणं सुरू झाल्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला. (Suddenly a romantic song in front of the class)

मुलं आरडा ओरडा करीत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे मुली शरमेनं मान खाली घातल असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडीओ giedde नावाच्या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Romantic film, Social media, Video viral