मराठी बातम्या /बातम्या /Viral /आईचं कर्ज नाही, तर तिचं EMI फेडतोय 7 वर्षांचा चिमुरडा; कसं? पाहा VIDEO

आईचं कर्ज नाही, तर तिचं EMI फेडतोय 7 वर्षांचा चिमुरडा; कसं? पाहा VIDEO

 नोकरी किंवा कामासाठी जात नाही. त्याचा कोणताही व्यवसाय नाही. तुम्ही म्हणाल, `हे कसं शक्य आहे?` अर्थात या प्रश्नाचं उत्तरही याच व्हिडिओत आहे.

नोकरी किंवा कामासाठी जात नाही. त्याचा कोणताही व्यवसाय नाही. तुम्ही म्हणाल, `हे कसं शक्य आहे?` अर्थात या प्रश्नाचं उत्तरही याच व्हिडिओत आहे.

नोकरी किंवा कामासाठी जात नाही. त्याचा कोणताही व्यवसाय नाही. तुम्ही म्हणाल, `हे कसं शक्य आहे?` अर्थात या प्रश्नाचं उत्तरही याच व्हिडिओत आहे.

  नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : आईसाठी (Mother) मुलांचं पालकत्व, संगोपन (Parenting) हे एखाद्या टास्कसारखं (Task) असतं. मुलांचा सर्वांगीण विकास, शिक्षण, आरोग्याची काळजी आदी गोष्टी योग्य पद्धतीने व्हाव्यात यासाठी आईला विशेष लक्ष द्यावं लागतं. मुलांचा सर्वांगीण विकास होत असताना त्याला संस्कारांची जोड देणंही आवश्यक असतं. त्या दृष्टीनं आईला विशेष प्रयत्न करावे लागतात. अर्थात हे सर्व सांगण्याचं कारणही तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतोय.

  या व्हिडिओत असं दिसतंय, की अगदी लहान मुलगा स्वखर्चानं स्वतःची बिलं भरतो, अन्य जे काही खर्च झालेत, त्याचे पैसे आईला देतो. तसंच स्वतःच्या खोलीत वापरलेल्या वीजेचं बिल (Electricity Bill), आयपॅडचं इंटरनेट बिलही (Internet Bill) तो स्वतः भरताना दिसतो. हे सर्व करताना तो बाहेर कुठेही नोकरी किंवा कामासाठी जात नाही. त्याचा कोणताही व्यवसाय नाही. तुम्ही म्हणाल, `हे कसं शक्य आहे?` अर्थात या प्रश्नाचं उत्तरही याच व्हिडिओत आहे. याबाबतची माहिती `आज तक`ने दिली आहे.

  एका महिलेनं मुलांच्या संगोपनासाठी निवडलेला मार्ग सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत फ्लोरिडा (Florida) येथे राहत असलेली ही महिला आपल्या लहान मुलाकडून वीज बिल, इंटरनेट बिल, घरभाडं वसूल करते. हे सर्व देण्यासाठी या लहान मुलाकडे पैसा येतो कुठून, या प्रश्नाचं उत्तर या महिलेनं @Craftandcreazy या टिकटॉक अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करून दिलं आहे. त्यात ही महिला सांगते, की `मी माझ्या 7 वर्षांच्या मुलाला पगार देते. घरातली लहान-मोठी कामं करण्यासाठी हा पगार त्याला दिला जातो. या पगाराच्या रकमेतून तो सर्व बिलं चुकती करतो.`

  हे ही वाचा-VIDEO: खरोखरचं Man vs Wild! घराबाहेर आलेल्या मगरीला पकडण्याचा थरार कॅमेरात कैद

  या महिलेची पालकत्वाची ही पद्धत सोशल मीडियावर वादाचा विषय ठरली आहे. काही जणांनी या पद्धतीचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी या महिलेवर टीकेची झोड उठवून 'मुलांना मुलांसारखंच सांभाळावं, जीवनातल्या पुढील वाटचालीतही त्याला पैशांचा ताण सहन करावा लागणार आहे,' असा सल्ला दिला आहे.

  पालकत्वाच्या या वेगळ्या पद्धतीविषयी ही महिला सांगते, की `माझ्या मुलाला रोज घरातली लहान-मोठी कामं करावी लागतात. यासाठी मी त्याला रोज एक टास्क लिस्ट देते. माझ्या मुलानं या लिस्टमधली सर्व कामं व्यवस्थित केली तर त्याला एका दिवसाचा पगार म्हणून एक डॉलर (74 रुपये) देते. महिनाअखेरीस मुलाला सर्व बिलं चुकती करावी लागतात. त्यात खोलीभाडं, तो वापरत असलेल्या खोलीचं वीजबिल, आयपॅडवरच्या इंटरनेटचं बिल यांचा समावेश असतो. मुलांना पैशांचं महत्त्व समजावं, हा या पालकत्व पद्धतीचा उद्देश आहे. सर्व बिल भरल्यावर उरलेले पैसे माझा मुलगा आपल्या छंदासाठी किंवा आवडत्या गोष्टींसाठी खर्च करतो.`

  `माझा मुलगा बिलाच्या स्वरूपात जी रक्कम मला देतो, ती मी खर्च करत नाही. मुलासाठी सुरू केलेल्या बचत खात्यात हे पैसे जमा करते,` असं त्या महिलेनं सांगितलं.

  पालकत्वाची ही पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, अनेकांनी या महिलेवर टीका केली आहे. काही युझर्सनी तिचं कौतुकही केलं आहे. या व्हिडिओवर कमेंट (Comment) करताना एक युजर म्हणतो, की `अनेक लोक वयस्कर होऊनदेखील त्यांना पैशांचं महत्त्व समजत नाही. त्यामुळे ही पद्धत चांगली आहे.` अजून एक युझर कमेंट करताना लिहितो, की `पालकत्वाची ही पद्धत आता पुढच्या स्तरावर गेली पाहिजे. मुलाने वेळेवर बिलं भरली नाही, तर त्याला लेट फी आकारली पाहिजे.`

  एकूणच पैशांच महत्त्व मुलाला समजावं, यासाठी या महिलेनं शोधलेली पालकत्वाची अनोखी पद्धत चर्चेत असून, हा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला आहे.

  First published:

  Tags: Electricity bill, Mother, Parents, Social media, Video viral